पुणे, 19 फेब्रुवारी 2025: टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्स या भारतातील एका आघाडीच्या खाजगी जीवन विमा कंपनीने पुण्यामध्ये ‘प्लेज टू प्रोटेक्ट’ या उपक्रमाचे आयोजन करून जीवनांचे रक्षण करण्याप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली. आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीमध्ये १ लाख जीवने सुरक्षित करण्याच्या कंपनीच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाचा हा एक भाग आहे.
टाटा एआयएने आयोजित केलेल्या एक रोडशोमध्ये २८० सल्लागार, लीडर्स आणि कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. पुण्यातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर वॉकथॉनचे आयोजन करून विम्याविषयी जागरूकता वाढवण्याचा संदेश दिला गेला. ‘सर्व भारतीयांसाठी विमा’ ही घोषणा देत सहभागींनी वॉकथॉन पूर्ण केली. टाटा एआयएच्या चार शाखांमध्ये चार रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये १२६ पिशव्या रक्त जमा झाले. ५० पेक्षा जास्त कर्मचारी आणि सल्लागारांनी पुणे स्कूल अँड होम फॉर द ब्लाइंडला भेट दिली व तेथील विद्यार्थ्यांना भेटवस्तू व खाऊचे वाटप केले. १८० कर्मचारी आणि सल्लागारांनी निवारा ओल्ड इज होमला भेट दिली, तिथे खुर्च्या, धान्य, साखर व इतर वाणसामान दान केले.
टाटा एआयएचे प्रोप्रायटरी बिझनेसचे चीफ डिस्ट्रिब्युशन ऑफिसर श्री अमित दवे यांनी सांगितले, “जीवन विमा लोकांना, समाजातील सर्वात असुरक्षित घटकांना हवी असलेली आर्थिक सुरक्षा पुरवतो. त्यामुळे जीवन विम्याविषयी जागरूकता निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. टाटा एआयए आपल्या ‘प्लेज टू प्रोटेक्ट’ उपक्रमातून भारतीयांसाठी आर्थिक समावेश आणि आर्थिक सुरक्षेला प्रोत्साहन देत आहे. भारतामध्ये जास्तीत जास्त लोकांना विमा सुरक्षा मिळावी यासाठी आम्ही बांधील आहोत. जानेवारी ते मार्च तिमाहीमध्ये १ लाख जीवने सुरक्षित करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी टाटा एआयए अथक प्रयत्नशील राहील.”
‘प्लेज टू प्रोटेक्ट’ मोहिमेंतर्गत टाटा एआयएने अनेक वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत, त्यांच्या भारतभरातील ५९९ शाखा व १.४३ लाख एजंट्स व कर्मचारी यामध्ये सहभागी होत आहेत. रोडशो, जॉगर्स पार्कमधील ऍक्टिव्हिटीज, गृहसंकुलांमधील विविध कार्यक्रम, आरोग्य शिबिरे यांचा त्यामध्ये समावेश आहे. जास्तीत जास्त स्थानिक पातळीवर संपर्क साधण्याबरोबरीनेच ही कंपनी स्थानिक स्वयंसेवी संस्था, पंचायत आणि स्वयंसहायता समूहांच्या सहयोगाने ग्रामीण व अर्ध-शहरी भागातील लोकांना विम्याविषयी माहिती देईल.
टाटा एआयएच्या ५५० पेक्षा जास्त शाखांनी ही मोहीम आधीच सुरु केली आहे, यामध्ये ७०,००० एजंट्स, कर्मचारी आणि ग्राहक सहभागी झाले आहेत.
विम्याबरोबरीनेच, ‘जागृती’ या आपल्या आर्थिक साक्षरता उपक्रमामार्फत टाटा एआयए आर्थिक सक्षमतेला देखील प्रोत्साहन देत आहे. यामध्ये टाटा एआयएचे कर्मचारी वंचित समुदायांना अत्यावश्यक आर्थिक उपाययोजनांची, साधनांची माहिती देतात. एक संरचनाबध्द प्रशिक्षण मोड्यूल हिंदी, इंग्रजी आणि क्षेत्रीय भाषांमध्ये उपलब्ध करवून देण्यात आले आहे, कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडील माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. प्रत्येक कर्मचाऱ्याने त्यांच्या नेटवर्कमधील कमीत कमी चार व्यक्तींना आत्मविश्वास मिळवून द्यावा जेणेकरून त्यांना माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यात मदत मिळावी हा यामागचा उद्देश आहे. ३३०० पेक्षा जास्त टाटा एआयए कर्मचाऱ्यांनी याआधीच या उपक्रमामध्ये भाग घेतला आहे.