मुंबई, 19 फेब्रुवारी 2024 – महिंद्रा समूहाची रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा विकास शाखा महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड (MLDL) ने लिव्हिंगस्टोन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड (LS) सोबत महालक्ष्मी येथील क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पासाठी भागीदारी केली असून त्याचे एकूण विकास मूल्य (GDV) 1,650 कोटी रु. आहे.
महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमित कुमार सिन्हा म्हणाले, “ही विकास योजना महिंद्रा लाइफस्पेसच्या दक्षिण मुंबईच्या प्रीमियम रिअल इस्टेट मार्केटमधील धोरणात्मक विस्ताराचे प्रतीक आहे. हा प्रकल्प मुंबईच्या नागरी नूतनीकरणात महत्त्वाची भूमिका बजावेल. या पुनर्विकास प्रकल्पामध्ये अत्याधुनिक डिझाईन, शाश्वत घटक आणि प्रीमियम सुविधांचा समावेश असेल आणि त्यामुळे शहराच्या स्काय लाईनमध्ये भरीव बदल घडेल.”
उच्चभ्रू महालक्ष्मी भागात स्थित असलेला हा प्रकल्प दक्षिण मुंबईतील सर्वाधिक मागणी असलेल्या परिसरांपैकी एका प्रमुख ठिकाणी आहे. या स्थानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या भागातून सगळीकडे जाण्यासाठी असलेली उत्कृष्ट कनेक्टीव्हीटी. दक्षिण मुंबईतील प्रमुख व्यावसायिक ठिकाणे, अत्यावश्यक सेवा आणि करमणुकीसाठीच्या ठिकाणांपर्यंत येथून सहजी जाता येऊ शकते.