‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात शिवजयंती जल्लोषात

Date:

पुणेः सनई-चौघड्यांच्या मंजुळ स्वर, तुतारीच्या गगनभेदी गर्जना, ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका, मर्दानी खेळ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’ ‘जय भवानी, जय शिवराय!’, ‘नमो पार्वती पते, हर…हर.. महादेव’… या घोषणांचा जयघोष अशा जल्लोषपूर्ण वातावरणात येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५वी जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे प्रतिक असणारा भगवा ध्वज फडकावून जयंती उत्सवास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी एमआयटी ‘एडीटी’च्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, कुलगुरू प्रा. डाॅ.राजेश एस., प्र.कुलगुरू डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डाॅ.सुराज भोयार, परीक्षा विभाग संचालक डाॅ.ज्ञानदेव निलवर्ण, डाॅ.अतुल पाटील, डाॅ.सपना देव आदी मान्यवर उपस्थित होते.    याप्रसंगी, लोणी-काळभोर व कदमवाक वस्ती ग्रामपंचायत येथील नागरिक, ‘एमआयटी-एडीटी’चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि शेकडो विद्यार्थ्यांच्या समोर विद्यार्थ्यांनी शिवरायांवरील कविता व पोवाडा आणि पाहाडी आवाजातील शिवगर्जना यामुळे उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक नृत्य व मैदानी खेळांची प्रात्याक्षिके देखील दाखवण्यात आली. शिवरायांची पालखीसह मिरवणूक व त्यानंतर अश्वारूढी पुतळ्याला क्रेनद्वारे पुश्वहार अर्पण केल्यानंतर महाराजांची आरती करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.         यावेळी बोलताना, प्रा.डाॅ.कराड म्हणाले की, माझ्या ऑफिस मध्ये असणाऱ्या छत्रपती शिवाजीराजांच्या मूर्ती पुढे नतमस्तक होऊन दिनक्रम सुरू करतो. कारण छत्रपती शिवराय हे उर्जेचा प्रचंड मोठा स्त्रोत आहेत. आयुष्यात कितीही मोठ्या समस्या, संकटे आली तरी शिवचरित्र वाचल्यास त्यावर मार्ग सापडतो. त्यामुळे शिवराय आपल्यातच आहेत व ते आज ३९५ वर्षांचे झाले असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे शिवछत्रपतींचे गुण आत्मसात करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करणे हीच खरी शिवजयंती असेल, असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.  
रक्तदान शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद-शिवजयंतीच्या पार्श्वभूमिवर विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर व गडकिल्ले बनविण्याच्या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्फुर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान शिबिरात तब्बल २१६+ दात्यांनी रक्तदान केल्याने हे शिबिर अत्यंत यशस्वी ठरले. विद्यापीठाच्या नवीन आयटी इमारतीच्या प्रवेशद्वारावर या दोन्ही उपक्रमांचे आयोजन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले होते. ‘एमआयटी-एडीटी’च्या विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिरासारखे सामाजिक उपक्रम राबवून शिवजयंती साजरी केल्याने परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्वारगेट बसस्थानकाचा वीजपुरवठा सुरळीतच- महावितरण

मंगळवारी रात्रभर वीज खंडित नव्हती पुणे, दि. १२ मार्च...

करीअर सोबतच मुलांवर चांगले संस्कार करा-सामाजिक कार्यकर्त्या शोभा धारिवाल

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शतकोत्तर...

दीदी कृष्णा कुमारी यांना आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार

पुणे - रोटरी क्लब ऑफ निगडी, पुणे यांनी साधू वासवानी मिशनच्या प्रमुख दीदी कृष्णा कुमारी यांना शांतता आणि सौहार्द वाढविण्यासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार, ११ मार्च रोजी सायंकाळी ७:०० वाजता एल्प्रो ऑडिटोरियम, एल्प्रो सिटी स्क्वेअर, चिंचवड, पुणे येथे झाला.निगडी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन सुहास ढमाले यांनी मेळाव्याचे स्वागत केले आणि दीदी कृष्णा कुमारी यांनी असंख्य व्यक्तींना आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि विकसित होण्यास कसे प्रेरित केले आहे यावर प्रकाश टाकला.डीजीएन रोटेरियन नितीन ढमाले यांनी सांगितले की, रोटरी अनेक मानवतावादी प्रयत्नांमध्ये सहभागी आहे, परंतु शांतीचे राजदूत विकसित करणे हे त्यांच्या ध्येयाचे केंद्रबिंदू आहे.पीस डायरेक्टर रोटेरियन. त्यानंतर रानू सिंघानिया यांनी दीदी कृष्णाची ओळख करून दिली आणि त्यांचे वर्णन असे केले की त्या खोल भावनिक बुद्धिमत्ता आणि खोल आध्यात्मिक बुद्धिमत्ता दोन्हीचे उदाहरण दिले. त्यांनी दीदींच्या केवळ शब्दांद्वारेच नव्हे तर त्यांनी दाखवलेल्या करुणेद्वारे शांती निर्माण करण्याच्या क्षमतेबद्दल बोलले.त्यानंतर, दीदी कृष्णा कुमारी यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना पुरस्कार देण्यात आले. आपल्या स्वीकृती भाषणात, दीदींनी नम्रपणे सांगितले की तिचे गुरू - साधू वासवानी आणि दादा जे.पी. वासवानी - अधिक पात्र होते. त्यांनी त्यांचे वर्णन 'शांतीचा खरा पैगंबर" /दूत असे केले.दीदींनी एका सामान्य गैरसमजाचे निराकरण केले: "बरेच लोक असा विश्वास करतात की ते एकटे वैयक्तिकरित्या जागतिक शांततेत योगदान देऊ शकत नाहीत. पण युद्धे कशामुळे होतात? मत्सर, स्वार्थ. जर हे आपल्या आतून सुरू झाले तर शांती देखील आली पाहिजे." शांती हा जन्मसिद्ध हक्क आणि जीवनपद्धती आहे, असे दीदी कृष्णा म्हणाल्या. त्यांनी शांती विकसित करण्याचे सहा सोपे मार्ग सांगितले: संयम निवडा, वर्तमानात जगा, कृतज्ञ रहा, क्षमा करायला शिका, निःस्वार्थ प्रेम करा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात देवासोबत करा आणि पहिला क्षण शांततेत घालवा.या कार्यक्रमात प्रमुख वक्ते आर.टी.एन. सुहास ढमाले, सचिव आरटीएन रवींद्र कदम, संचालक आरटीएन राणू सिंघानिया, डीजीएन आरटीएन नितीन ढमाले, आरटीएन राकेश सिंघानिया, आरटीएन सुजाता ढमाले, आरटीएन ईश्वर ठाकूर आदी मान्यवर व अन्य सन्माननीय रोटेरियन उपस्थित होते.संध्याकाळची सांगता दीदींच्या मार्गदर्शनाखाली ध्यानधारणेने झाली, जिथे उपस्थितांनी अलौकिक शांतीचे क्षण अनुभवले.पूर्वी ध्यानात रस नसलेल्या एका ६२ वर्षीय महिलेने सांगितले की, दीदींच्या शब्दांनी तिच्या विचारांना उजळून टाकले आहे. दीदी कृष्णा बद्दलदीदी कृष्णाने तिच्या आयुष्याची सुरुवात साधू वासवानी आणि दादा जे.पी. वासवानी यांच्या मार्गदर्शनाने केली. तो वासवानीच्या शिकवणींना समर्पित आहे आणि सर्व प्राण्यांसाठी प्रेम, सेवा आणि श्रद्धेचा संदेश पसरवत आहे. साधू वासवानी मिशनच्या प्रमुख म्हणून, त्या शिक्षण, आरोग्यसेवा आणि मदत कार्यातील मानवतावादी उपक्रमांची देखरेख करतात. ती तिच्या गुरूंचे ज्ञान सामायिक करण्यासाठी व्यापक प्रवास करते आणि विविध श्रोत्यांना संबोधित करते, ज्यात आंतरधर्मीय मेळावे आणि जागतिक शांतता मंचांचा समावेश आहे.

धंगेकरांनंतर अजून एक फायरब्रँड नेत्या सुलभा उबाळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला

पुणे-राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सध्या मिशन टायगर...