मुंबई, – आर्थिक गुन्हेगारीच्या वाढत्या समस्येला तोंड देण्यासाठी लक्षणीय पाऊल उचलत राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटी (RRU) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स (IICA) यांनी एकत्रितपणे मास्टर्स इन फायनान्शियल्स अँड इकॉनॉमिक क्राइम्सविषयी (MFEC) जागरूकता निर्माण करण्यासाठी संवादी सत्राचे आयोजन केले होते. नुकतेच पार पडलेले हे सत्र बीकेसी, मुंबई येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आले होते.
अभ्यासक्रमाचा आढावा
MFEC ची रचना आर्थिक गुन्हेगारीमुळे निर्माण होत असलेली आव्हाने सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण पद्धतीने हाताळण्यासाठी करण्यात आली आहे. या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमामध्ये कायदा, वित्त, तंत्रज्ञान आणि धोरणे अशा महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला असून त्याद्वारे व्यावसायिकांना आर्थिक गुन्हेगारीशी लढण्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकवून सक्षम केले जाते. नोकरदार व्यावसायिकांसाठी खास तयार करण्यात आलेला हा एक वर्षाचा अभ्यासक्रम हायब्रीड पद्धतीने घेतला जाणार आहे.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये
या कार्यक्रमात महत्त्वाच्या आर्थिक भागधारकांच्या सहभागाला चालना देण्यात आली. यावेळी डॉ. बिमल पटेल, RRU चे उपकुलगुरू, श्री. रोहित जैन, कार्यकारी संचालक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, श्री. व्ही एस सुंदरसन, कार्यकारी संचालक, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडी, डॉ. नीरज गुप्ता, प्रमुख SoF&M, IICA, उद्योगक्षेत्रातील इतर नामवंतांनी देश तसेच जागतिक आर्थिक सुरक्षेसाठी आर्थिक गुन्हेगारीला प्रतिबंध करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमातून या अभ्यासक्रमाचे रेग्युलेटरी एजन्सीज, कायदा– सुव्यवस्था क्षेत्रातील घटक आणि आर्थिक संस्थांमध्ये सहकार्य करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. वेगवेगळे परिसंवाद, सादरीकरण, भागधारकांसह संवाद यांच्या माध्यमातून या कार्यक्रमात आर्थिक गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वसमावेशक धोरणाची अतिशय गरज असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यातूनच सुरक्षित व लवचिक आर्थिक यंत्रणा तयार होईल यावर एकमत झाले.
जागरूकता निर्माण करण्यातील भूमिका
या अभ्यासक्रमाच्या संवादी सत्रादरम्यान आर्थिक गुन्हेगारीचा राष्ट्रीय आणि जागतिक आर्थिक स्थैर्यावर परिणाम होत असल्याचे अधोरेखित करण्यात आले. नियम पालन, नियामक चौकट आणि जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धती यांविषयी माहितीचे वाटप करून MFEC ने पैशांची मनी लॉन्ड्रिंग, सायबर फसवणूक आणि कॉर्पोरेट गैरव्यवहारांसारख्या विविध प्रकाराच्या गुन्हेगारीशी लढा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
या उपक्रमाद्वारे तज्ज्ञांच्या नव्या वर्गाला प्रशिक्षिण देण्यासाठी RRU आणि IICA बांधील आहेत. हे तज्ज्ञ या महत्त्वाच्या समस्यांविषयी सार्वजनिक व संस्थात्मक जागरूकता निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. या अभ्यासक्रमाद्वारे व्यावसायिकांना विविध टुल्ससह सक्षम केले जाईल, शिवाय आर्थिक गैरव्यवहारांशी संबंधित धोके कसे कमी करायचे हे सांगण्यात येईल.
भागधारकांमधील संवाद कायदा सुव्यवस्था यंत्रणा, नियामक मंडळे आणि आर्थिक संस्थांमधील भागिदारी वाढवण्यासाठी, त्यांच्यात सहकार्याला व ज्ञानाच्या देवाणघेवाणीस चालना देण्याच्या उद्दिष्टाने तयार करण्यात आला आहे.
धोरण आणि उद्दिष्टे
२०४७ पर्यंत ३० ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवण्याची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारतात लवचिक आणि दमदार आर्थिक यंत्रणा विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे.
त्याशिवाय सरकारी आणि खासगी क्षेत्रातील व्यावसायिकांचा कौशल्य विकास करून त्यांना आर्थिक गुन्हेगारीविरोधात लढण्यासाठी नेतृत्व स्थानांसह सक्षम करण्याचे ध्येय आहे.
जागतिक दृष्टीकोन
या अभ्यासक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय नियमावलीचा समावेश करण्यात आला असून FATF, INTERPOL सारख्या जागतिक संस्थां तसेच एशिया- पॅसिफिक ग्रुपसह सहकार्यावर सीमेपार आर्थिक गुन्हेगारी प्रभावीपणे हाताळण्यासाठी भर देण्यात आला आहे. सुरक्षित आणि समृद्ध आर्थिक भविष्य घडवण्यासाठी या प्रोग्रॅममध्ये आर्थिक भागधारकांमधील सहकार्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
आपण वेगाने गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितीकडे जात आहोत आणि MFEC सारखे उपक्रम संस्थांमध्ये सचोटी व नियमपालनाची संस्कृती रूजवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. हा प्रोग्रॅम आपली अर्थव्यवस्था आर्थिक गुन्हेगारीच्या दुष्परिणामांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी सक्रिय प्रयत्न करणारा आहे.
राष्ट्रीय रक्षा युनिर्व्हसिटीमध्ये सुरू करण्यात आलेला मास्टर्स प्रोग्रॅम इन फायनान्शियल अँड इकॉनॉमिक क्राइम्स आर्थिक गुन्हेगारीच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी करण्यात आलेला महत्त्वाचा उपक्रम आहे. भावी व्यावसायिकांना आवश्यक कौशल्यांनी सक्षम करत RRU ने भारताची आर्थिक गुन्हेगारीला लढा देण्याची क्षमता बळकट करण्याचे ध्येय ठेवले आहे.