पुणे-देशातील वाढत्या बेरोजगारीबद्दल केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात युवक कॉंग्रेस हल्लाबोल आंदोलन सुरु करणार आहे अशी माहिती येथे पुणे शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे यांनी पत्रकार परिषदेतून दिली .
ते म्हणाले,’महाराष्ट्रात प्रामुख्याने पुण्यात विविध प्रकारचे अंमली पदार्थ खुले आम पणे विक्री होत आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे देशातील व प्रामुख्याने महाराष्ट्रात बेरोजगारी वाढत आहे.वाढती महागाई, बेरोजगारी, व्यसनाधीनता आणि भविष्याची अनिश्चितता यातून बरेच युवक गुन्हेगारीकडे वळत असून यातून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत.
अनेक विविध स्थानिक पातळीवरील विषयांवर भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवक आंदोलनात सामील होणार असून या आंदोलनाबाबत महाराष्ट्र युवक कॉंग्रेस सहप्रभारी एहसानखान, महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडीया चेअरमन अक्षय जैन, प्रदेश सचिव विवेक कडू आणि पुणे युवक कॉंग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे यानी हि माहीती दिली उद्या १६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजता कॉंग्रेस भवन पुणे येथून हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात होतं आहे.या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र युवक कॉंग्रेस सहप्रभारी एहसानखान, महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडिया चेअरमन अक्षय जैन , प्रदेश सचिव विवेक कडू , प्रदेश सचिव प्रथमेश आबनावे ,अमोल दौंडकर आणि पुणे शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे उपस्थित होते

