सद्गुरु शंकर महाराज समाधी स्थळाच्या खालून मेट्रो मार्ग नको-शहरातील ३५ गणेशोत्सव मंडळांचे पुणे मेट्रो आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन
पुणे : स्वारगेट ते कात्रज या महामार्गाच्या रुंदीकरणाने धोक्यात आलेला सद्गुरु शंकर महाराज मठ आणि बालाजीनगरच्या असंख्य इमारती उड्डाण पुलाने वाचविल्या हा इतिहास असताना आता सद्गुरु शंकर महाराज मठ पुन्हा वाहतुक विकासाच्या योजनेमुळे धोक्यात येऊ पाहत आहे .स्वारगेट ते कात्रज हा मेट्रोचा भुयारी मार्ग धनकवडी येथील शंकर महाराज समाधीच्या खालून जात आहे. मेट्रोच्या या मार्गामुळे शंकर महाराजांच्या समाधी स्थळाला धोका पोहाेचू शकतो, त्यामुळे हा भुयारी मार्ग थोडा सरकवून घेतल्यास धोका होणार नाही आणि लोकांच्या भावना ही दुखावल्या जाणार नाहीत. असे निवेदन पुण्यातील ३५ गणेशोत्सव मंडळांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुणे मेट्रो च्या संचालकाना दिले आहे.
अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, श्री गुरुजी तालीम गणेशोत्सव, श्री तुळशीबाग गणपती, केसरी वाडा सार्वजनिक गणेशोत्सव, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळ, लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट, हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट, पासोड्या विठोबा मंदिर, कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट, साईनाथ मंडळ ट्रस्ट, श्री गजानन मंडळ ट्रस्ट, अकरा मारुती चौक मंडळ, महाराष्ट्र तरुण मंडळ, वीर शिवराज मंडळ, सेवा मित्र मंडळ, अकरा मारुती कोपरा गणेशोत्सव मंडळ, गुरुदत्त मित्र मंडळ, विधायक मित्र मंडळ, श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठान, जनार्दन पवळे संघ, थोरले बाजीराव मंडळ, तरुण शिव गणेश मित्र मंडळ, राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ, वीर हनुमान मित्र मंडळ, वैभव मित्र मंडळ, महाराष्ट्र तरुण मंडळ सिटी पोस्ट, फणी आळी तालीम मंडळ इत्यादी मंडळांनी पुढाकार घेतला आहे.
अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात म्हणाले, भूमिगत मेट्रो धनकवडी येथील सद्गुरु शंकर महाराज समाधीच्या खालून जाणार नाही, यासाठी योग्य मार्ग काढावा. पवित्र समाधीखाली भूमिगत मेट्रो ट्रॅक असणे ही धार्मिक आणि भावनिक दोन्ही दृष्टिकोनातून चिंतेची बाब आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो लोक मठात दर्शनासाठी येतात. विकास गरजेचा आहे, परंतु भक्तांच्या भावनांचा आदर देखील करायला हवा.
सद्गुरु शंकर महाराज मठ पुन्हा वाहतुक विकासाच्या योजनेमुळे धोक्यात
Date: