सौ विमलाबाई गरवारे हायस्कूल येथे रविवारी पुरस्काराचे वितरण
पुणे : स्व. म. वा. जोशी यांचे स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा (२०२४-२५) चा “अन्नब्रम्ह” हा पुरस्कार पुणे शहरातील नामांकित “श्री मुरलीधर व्हेज” पूर्वाश्रमीचे मुरलीधर भोजनालय; संचालक ‘श्री व सौ शारदा गोपाळदादा तिवारी कुटुंबीय”यांना जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कार प्रदान कार्यक्रम रविवार, दि. १६ फेब्रु वारी 2025 रोजी रोजी सायं ६ वा. सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल, प्रभात रोड, पुणे येथे संपन्न होणार आहे.
ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हासदादा पवार यांचे अध्यक्षते खाली, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांचे हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पुरस्काराचे संयोजक डॉ. न. म. जोशी यांनी दिली आहे.
नारायण पेठेतील “श्री मुरलीधर व्हेज (भोजनालय)” हे भोजनालय गेली अनेक वर्षे पुणेकरांच्या सेवेत कार्यरत आहे. विद्यार्थी, नोकरदार व चोखंदळ पुणेकर यांना सकस जेवण उपलब्ध करून देण्याचा सेवाभाव जोपासत आहे. त्यांचा दर्जा व सेवा याबाबत चौफेर होत असलेली ख्याती, ग्राहकांचा अनुभव इ लक्षांत घेऊन त्यांना यंदाचा अन्नब्रम्ह पुरस्कार जाहीर करत असल्याचे डॉ. न. म. जोशी यांनी सांगितले.
सदर पुरस्कार आम्ही विद्येचे माहेरघर’ असलेल्या पुण्यनगरीत, परगावच्या विद्यार्थ्यांना भोजन खाऊ घालतांना व्यावसायिक दृष्टीकोनास, सामाजिक दृष्टीकोनाची जोड देत विद्यार्थ्यांची व विविध कारणाने पुणे शहरात येणाऱ्या ग्राहकांची सेवा करणाऱ्या ‘मुरलीधर भोजनालयाची’ विशेष नोंद या पुरस्काराच्या निमित्ताने घेण्यात आली आहे.