गुरुग्राम, 13 फेब्रुवारी 2025: एअर इंडियाने उत्तर गोलार्धातील उन्हाळ्याच्या वेळापत्रकांतर्गत 30 मार्च 2025 पासून प्रभावी ठरणाऱ्या काही महत्त्वाच्या मार्गांवर आज आपल्या अतिरिक्त सेवा जाहीर केल्या आहेत:
युनायटेड किंगडम:
· दिल्ली-लंडन हीथ्रो: आठवड्यातील 3 अतिरिक्त उड्डाणे वाढवून ही संख्या आता आठवड्यातील 21 वरून 24 उड्डाणे अशी झाली आहे. ही सेवा एअर इंडियाच्या प्रमुख A350-900 आणि सुधारित B787-9 विमानांद्वारे देण्यात येईल.
· अमृतसर-बर्मिंगहॅम: दर आठवड्याला 3 वरून 4 उड्डाणे.
· अमृतसर-लंडन गॅटविक: दर आठवड्याला 3 वरून 4 उड्डाणे.
· अहमदाबाद-लंडन गॅटविक: दर आठवड्याला 3 वरून 5 उड्डाणे.
युरोप:
· दिल्ली-झ्युरिक: दर आठवड्याला 4 वरून 5 उड्डाणे.
· दिल्ली-व्हिएन्ना: दर आठवड्याला 3 वरून 4 उड्डाणे.
फार ईस्ट (आग्नेय आशिया) आशिया:
· दिल्ली-सेऊल (इंचेऑन): दर आठवड्याला 4 वरून 5 उड्डाणे.
· दिल्ली-हॉंगकॉंग: सध्याच्या A321 ऐवजी B787 ड्रीमलाईनर वर आठवड्यात 7 उड्डाणे.
·
आफ्रिका:
· दिल्ली-नैरोबी: दर आठवड्याला 3 वरून 4 उड्डाणे.
एअर इंडियाच्या नॅरोबॉडी विमानांचे आधुनिकीकरण चांगल्या प्रकारे सुरू असून ते 2025 च्या मध्यापर्यंत पूर्ण होईल. याशिवाय, मोठी परंपरा असलेल्या वाईडबॉडीज विमानांपैकी पहिले बोईंग 787 विमान एप्रिलमध्ये नवीन सीट्स आणि मनोरंजन प्रणालीसह पुनर्रचना सुरू करेल आणि ऑक्टोबर 2025 मध्ये सेवेत पुन्हा सामील होईल. त्यानंतर, सर्व 27 पारंपरिक विमानांचे अपग्रेड पूर्ण होईपर्यंत दरमहा दोन ते तीन B787s ची भर पडेल.
पारंपरिक बोईंग 777 विमाने नवीन सीट्स आणि मनोरंजन प्रणालीसह पुनर्रचना होऊन सुरुवातीला 2025 मध्ये सेवा द्यायला सुरूवात करणार होती. परंतु आता निवडलेल्या सीट पुरवठादाराच्या उत्पादन मर्यादांमुळे 2026 च्या सुरुवातीस सेवेत येतील. दरम्यान, एअर इंडिया 2025 मध्ये पूर्ण पुनर्रचना कार्यक्रमाच्या आधी B777 च्या अंतर्गत भागांमध्ये शक्य तितक्या सुधारणा करत आहे.
पुनर्रचना कार्यक्रम आणि परिणामी वाहतूक ताफ्यातील तात्पुरत्या कपातीमुळे, एअर इंडिया 30 मार्च ते 13 सप्टेंबर 2025 दरम्यान मुंबई-मेलबर्न थेट सेवा तसेच 30 मार्च 2025 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत कोची-लंडन गॅटविक थेट सेवा या काळासाठी थांबवत आहे. एअर इंडिया अमृतसर, अहमदाबाद आणि गोवा येथून लंडन गॅटविकला आठवड्यात12 उड्डाणे चालू ठेवणार आहे.