बंगळुरू (भारत), 13 फेब्रुवारी 2025 – एरो इंडिया 2025 दरम्यान, भारत फोर्ज आणि लिब्हेर यांनी जागतिक एरोस्पेस उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादन प्रकल्प स्थापन करण्याच्या भागीदारीची घोषणा केली. या धोरणात्मक भागीदारीअंतर्गत, भारत फोर्ज आपल्या पुणे (भारत) मुख्यालयात अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प उभारणार असून, ती 2025 मध्ये कार्यान्वित होण्याची योजना आहे.
नवीन प्रकल्प अत्याधुनिक फोर्जिंग आणि मशिनिंग तंत्रज्ञानासह रिंग मिल असणार आहे, ज्याद्वारे लँडिंग गीयर घटकांसह उच्च-प्रेसिजन घटकांचे उत्पादन केले जाईल.
भारत फोर्ज लिमिटेडच्या नेतृत्वाखालील ही गुंतवणूक, लिब्हेर आणि त्याच्या जागतिक ग्राहकांसाठी उच्च दर्जाच्या समाधानांची पूर्तता करण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते.
भारत फोर्ज लिमिटेडचे एरोस्पेस सीईओ गुरू बिस्वाल म्हणाले की, “लिब्हेरसोबतचे हे सहकार्य एरोस्पेस उत्पादन क्षेत्रातील नवकल्पना आणि उत्कृष्टतेबाबत आमच्या सामाईक वचनबद्धतेचा पुरावा आहे. रिंग मिल आणि लँडिंग गीयर मशिनिंग क्षमतांमधील आमच्या गुंतवणुकीमुळे, अचूक अभियांत्रिकी घटक प्रदान करण्यावर आणि एरोस्पेस उद्योगासाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्यावर आमचा भर असल्याचे स्पष्ट होते.”
लिब्हेर–एरोस्पेस अँड ट्रान्सपोर्टेशन एसएएसचे चीफ कस्टमर ऑफिसर अॅलेक्स व्हिलँडर यांनी सांगितले की, “ही अत्याधुनिक प्रकल्प स्थापन करण्यासाठी भारत फोर्जसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. या प्रगत तंत्रज्ञानांच्या एकत्रीकरणामुळे आम्हाला एरोस्पेस क्षेत्राच्या कठोर मानकांची पूर्तता करता येईल, तसेच आमची पुरवठा साखळी क्षमता मजबूत करता येईल.”