विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर तर्फे आयोजन
पुणे: विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पोर्ट्स लीगमध्ये फुटबॉल, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल स्पर्धा होणार आहेत. वानवडी येथील एस.आर.पी. एफ. मैदानावर दिनांक १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सचिव जितेंद्र पितळीया आणि प्राचार्य प्रसन्न देसाई यांनी दिली.
यावेळी अध्यक्ष अभय छाजेड, क्रीडा संघ सदस्य समीक्षा वानवे, सनी गुंजाळ, ऋचा बाणकर, पायल जयस्वाल, प्रथम चांडक, कार्तिक हादके, नमन पारेख, आदित्य पवार, कर्ण तोरस्कर, कविता ताजने उपस्थित होते.
बास्केटबॉल, फुटबॉल आणि व्हॉलीबॉल या स्पर्धांमध्ये १८ ते २३ या वयोगटातील सुमारे ६०० पेक्षा अधिक विद्यार्थी खेळाडू खेळणार आहेत. यामध्ये मुलांचे आणि मुलींचे एकूण ४३ संघ सहभागी होतील. स्पर्धेचे उद्घाटन १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे आणि पारितोषिक वितरण समारंभ दिनांक १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
स्पर्धेमध्ये पुण्यातील १४ वास्तुकला महाविद्यालयातील संघाचा समावेश आहे. यामध्ये मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (एम.एम. सी. ओ. ए.) , डाॅ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी (डी. वाय. पी. सी. ओ. ए.), डाॅ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, लोहेगाव (डी. वाय. पी. सी. ओ. ए.), भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (बी. एन. सी. ए.), अलाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (ए. सी. ओ. ए.), डाॅ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (डी. वाय. पी. सी. ओ. ए.), ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर (बी. एस. ओ. ए.), आयोजन स्कूल ऑफ डीझाईन (ए. एस. ए. डी.) , भारती विद्यापीठ डीम्ड युनीव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (बी. व्ही. डी. यू.), सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (एस. सी. ओ. ए.),एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पिंपरी चिंचवड (एस.बी.पी. सी.ओ.ए.),मराठवाडा मित्र मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ एन्विरॉन्मेंटल डिझाईन,डी.वाय.पी.सी.ई.टी. कोल्हापूर,श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (पी. व्ही.पी. सी. ओ. ए.)आदी महाविद्यालये स्पर्धेत सहभागी होणार आहेत.