शहरवासियांनी स्वत:च्या विकासासोबत गावाच्याही विकासावर भर दिला पाहिजे : प्रवीण दरेकर
पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे भव्य सत्कार, हळदी कुंकु समारंभ उत्साहात संपन्न
पुणे : पोलादपूर मुळ निवासी पुणे शहरात वास्तव्यास असणाऱ्या शहरवासीयांनी आपल्या गावाची नाळ न तोडता शहरात आपल्या विकासासोबत गावाच्या ही विकासाचा विचार करावा असे प्रतिपादन पोलादपूर भूमिपुत्र प्रवीण दरेकर (आमदार- विधान परिषद, अध्यक्ष-मुंबई बँक) यांनी पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे आयेजित भव्य सत्कार समारंभात बोलत होते.
पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे प्रवीण दरेकर यांच्या हस्ते माधुरीताई मिसाळ (राज्यमंत्री, महाराष्ट्र ) आणि संतोष मेढेकर (उद्योजक ) यांचा नरवीर तानाजी मालुसरे आणि सिंहगडची ऐतिहासिक प्रतिमा आणि शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास पोलादपूर तालुका रहिवासी संघ अध्यक्ष किसनजी भोसले, अरविंद चव्हाण (कार्याध्यक्ष), सुनील कदम (उपाध्यक्ष), राजेंद्र मोरे (सचिव), सचिन पार्टे (सहसचिव), ज्ञानेश्वर साळुंखे (कोषाध्यक्ष), ज्ञानेश्वर साळुंखे (खजिनदार), डॉ. खरोसे (सह-कोषाध्यक्ष), शंकर खरोसे (हिशेबानी), लहू उतेकर (सह-हिशेबानी), राजू कदम (कार्यकारी प्रतिनिधी), ड.पांडुरंग जगदाळे (सल्लागर) आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, “स्नेहसंमेलन, हळदी कुंकू कार्यक्रम दर वर्षी घेतले पाहिजे जेणेकरून कौटूंबिक जिव्हाळा निर्माण होतो . तसेच ज्या मातीतून आपण आलो त्यासाठीही पुणे मुंबई करांनी योगदान दिले पाहिजे. आमदार निधीतून पोलादपूर तालुका रहिवासी संघाचे भव्य कार्यालय बांधणसाठी उपलब्ध करून देवू असे” आश्वासन यावेळी दरेकर यांनी दिले.
राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ म्हणाल्या की, “प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, त्याच पध्दतीने कोणताही कार्यक्रम यशस्वी करण्याच्या मागे ही महिलांचा हाथ असतो, तो आज ऐवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थित महिलांना पाहून दिसत आहे. महिला ज्या प्रमाणे हळदी कुंकू समारंभात एकत्रित येतात, अशाच पध्दतीेने महिला सक्षमिकरणासाठी ही एकजूट होणे गरजेचे आहे”.
पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे आयोजित सत्कार समारंभ, स्नेहसंमेलन आणि हळदी कुंकू कार्यक्रमांस उदंड प्रतिसाद मिळला. यामध्ये सुमारे 4000 ते 4500 पोलादपूरवासी एकत्रित आले हाते. यावेळी खेळ पैठणीचा घेण्यात आला, यामध्ये 20 महिलांना पैठणी भेट देण्यात आली. तसेच पोलादपूरची प्रसिद्ध नथ भेट देण्यात आली. यामध्ये सुमारे 68 गावातील नागरिक सहभागी झाले होते. तसेच सुनंदा उपाळे, आशा कदम, छाया भोसले, जयश्री मोरे, सुनंदा पवार या जेष्ठ महिलांचाही सन्मान करण्यात आला.