थ्रिसुर,– कल्याण ज्वेलर्सने क्राफ्टिंग फ्युचर्स हा नवा क्रांतीकारी, सीएसआर उपक्रम जाहीर केला असून ब्रँडच्या विथ लव्ह या तत्वावर तो आधारित आहे. हा उपक्रम दागिने घडवणाऱ्या कारागिरांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांची कला जपण्यासाठी आणि सामाजिक विकास साधण्यासाठी हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा पाया रचून अमलबजावणी करण्यासाठी कल्याण ज्वेलर्सने तीन कोटी रुपयांची बांधिलकी जाहीर केली आहे. त्यामुळे सुरुवातीपासून या उपक्रमाचा ठोस परिणाम साधण्यास मदत होणार आहे.
व्यापक आणि अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी कल्याण ज्वेलर्स आपले भागीदार आणि भागधारकांना यात सहभागी होण्याचे आवाहन करत आहे. क्राफ्टिंग फ्युचर्स हा उपक्रम सुरू असून दीर्घकालीन कृती योजना त्याअंतर्गत आखण्यात आली आहे. त्यानुसार हा उपक्रम येत्या काही वर्षांत विकसित होईल आणि त्याचा वेगाने विस्तार केला जाईल.
‘दागिने म्हणजे केवळ सोने आणि जेमस्टोन्स नसतात, तर कारागीर आपली कला आणि आत्मा त्यात ओतून जिवंत करतात. त्यांची कारागिरी ही एक सजीव परंपरा आहे, जी जपणं आणि पुढे नेणं गरजेचं आहे. क्राफ्टिंग फ्युचर्सच्या मदतीने आम्ही पारंपरिक कारागिरी आधुनिक कामगिरीसह मेळ घालत या क्षेत्राचा वारसा जपणाऱ्या कारागिरांच्या पिढ्यांसाठी ठोस भूमिका घेत आहोत. या चळवळीमध्ये सहभागी होऊन प्रत्येक कारागिराला चांगले भविष्य मिळवून देण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे व योग्य मूल्य मिळवून देण्याचे आवाहन करतो,’ असे कल्याण ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक टीएस कल्याणरामन म्हणाले.
क्राफ्टिंग फ्युचर्स हा केवळ एक सीएसआर उपक्रम नाही, तर शाश्वत बदल घडवण्यासाठी आखलेली मोहीम आहे. हा उपक्रम परंपरांचा नाविन्याशी मेळ घालणारा, कामाची ठिकाणे सुधारणारा, तंत्रज्ञानाचा समावेश करणारा व कौशल्य विकासाची संधी देणारा आहे. या धोरणामुळे कारागिरांचा वारसा जपला जाईल, शिवाय त्यांना बदलत्या उद्योगक्षेत्रात टिकून राहाण्याची सक्षमता मिळेल. त्याशिवाय हा उपक्रम कारागिरांच्या मुलांच्या शिक्षणासा पाठिंबा देईल, आरोग्यसेवा पुरवेल आणि कारागीर व त्यांच्या कुटुंबीयांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी काम करेल.
हा उपक्रम पुढे नेत असताना कल्याण ज्वेलर्स दीर्घकालीन भागीदारक व भागधारकांना त्यात सहभागी होण्याचे आवाहन करत आहे. एकत्रितपणे कारागिरांना बहरण्यासाठी, परंपरा जपण्यासाठी व त्यांच्या योगदानाची दखल घेतली जाण्यासाठी शाश्वत यंत्रणा उभारण्याचे ध्येय आहे.