पुणे :शहराच्या कसबा पेठेतील कागदीपूरा परिसरामध्ये गुरुवारी मध्यरात्री(6 जानेवारी) वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मयूर गणेश अडागळे (वय १९), मंथन प्रकाश सकट (वय १९, दोघे रा. पीएमपी काॅलनी, कागदीपुरा, कसबा पेठ), ओम देविदास शिंदे (वय १९, रा. शिंदे वाडा, पारगे चौक, मंगळवार पेठ), सोहम राजेंद्र हराळे (वय २०, रा. दुर्गामाता मंदिर, कवडेवाडी, कोरेगाव पार्क) यांना अटक करून फरासखाना पोलिसांकडून चौघांची धिंड काढण्यात आली आहे. या प्रकरणी यासीन इम्तियाज शेख (वय २९, रा. राम-रहिम मित्र मंडळशेजारी, कागदीपुरा, कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शहराच्या कसबा पेठेतील कागदीपूरा परिसरामध्ये गुरुवारी मध्यरात्री(6 जानेवारी) वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. फिर्यातदार इम्तियाज शेख यांचे गेल्या वर्षी आरोपी अडागळे यांच्यासोबत भांडण झाले होते. याचा राग धरून गुरुवारी (6 जानेवारी) मध्यरात्री आरोपी अडागळे, शिंदे, हराळे आणि त्यांच्या अल्पवयीन साथीदारांनी कागदीपुरा भागात कोयत्याद्वारे दहशत माजविली होती. यात तक्रारदार शेख यांच्या रिक्षाची काच फोडली. त्याचबरोबर रस्त्यावर लावलेल्या दुचाकींची तोडफोड करून आरोपी पसार झाले होते.
या प्रकरणी शेख यांनी फिर्याद दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनात कारवाई करत पोलिसांनी आरोपींना अटक करून ज्या ठिकाणी त्यांनी वाहनांची तोडफोड केली होती त्याच भागातून त्यांची धिंड काढली. याबाबत अगोदरच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तोडफोड करणाऱ्या गुंडांविरुद्ध कडक कारवाईचा आदेश पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत.
कागदीपुऱ्यात वाहनांची मोडतोड करणाऱ्या गुंडांची काढली धिंड
Date: