पुणे-आंतरराष्ट्रीय सर्कस नकाशावर पुण्याचे नाव ठळकपणे नोंदवणारी जागतिक कीर्तीची रॅम्बो सर्कस पुण्यात सिंहगड रोड येथे फनटाईम थिएटरच्यामागील मैदानात शनिवार दि. ८ फेब्रुवारीपासून सूरु होत आहे. सर्कसचे रोज दुपारी ४.३० आणि सायंकाळी ७.३० असे शो आयोजित केले जाणार असून शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी दुपारी १.३० ,४.३० व सायंकाळी ७.३० असे ३ शो होणार आहेत. तिकीट दर : ७५० रु + जीएसटी, ५०० रु, ३५० रु, २०० रु आहे. रोज सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत आगाऊ बुकिंग उपलब्ध असून सर्व प्रेक्षकांकडून डेबिट/क्रेडिट कार्ड द्वारे पेमेंट स्वीकारले जाईल. www.rambocircus.in अथवा 9611554897 वर कॉल केल्यास बुकिंग उपलब्ध होईल. तसेच Instagram: weloverambocircus, Facebook : /rambocircus.india अँड Subscribe us on Youtube: rambocircus सर्कस प्रेमींना सर्कसला फोलो करता येईल. सर्व प्रेक्षकांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तीन वर्षा खालील बालकांना प्रवेश मोफत आहे. तसेच, अपंग, अंध, मतीमंद मुलामुलींच्या संस्थांनी संपर्क साधल्यास त्यांना मोफत सर्कस दाखवली जाईल. सैनिकांच्या कुटुंबियांना देखील सवलतीच्या दारात प्रवेश दिला जाईल, अशी माहिती रॅम्बो सर्कसचे मालक सुजित दिलीप यांनी दिली.
कोरोनाच्यानंतर नव्या जोमाने सुरु झालेल्या रॅम्बो सर्कसमध्ये १२०० प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था आहे. यामध्ये १२५ हून अधिक स्त्री-पुरुष कलावंत असून, सर्कसचा स्वतःचा स्वतंत्र बँड आहे. यामध्ये डिजिटल हत्ती हे विशेष आकर्षण असणार आहे. शिवाय मृत्युगोलात मोटार सायकलवरून चित्तथरारक कसरती, व्हील ऑफ डेथ, फ्लायिंग ट्रपिझ, स्वॉर्ड बॅलन्स, जग्लिंग, नवर्पट्टी, क्विकचेंज, इ-स्केटिंग, कॅण्डल, वाॅटर शो, इ-स्कीप्पिंग जंप, रोलाबोला , बेबी रोप, ग्लोब, रिंग डान्स, जर्मन वेल्स, रिंग ऑफ डेथ, सायकल मनोरा आदि. कलाप्रकार प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. सर्कसमध्ये ५ विदुषक असून वैविध्यपूर्ण करामतींच्या द्वारे ते बच्चे कंपनीला आनंद देतील.सर्कासचा मुक्कम एक महिना आहे.