बीड-करुणा मुंडे म्हणाल्या की, तुम्ही मंत्री आहे, मी काही नाही. मी वाईट महिला हे मान्य करते पण अनेक मोठ्या गोष्टी आहेत. मी तोंड उघडले धनंजय मुंडेंचेच नाही तर तर पंकजाताईंचे पण मंत्रिपद जाऊ शकते, असा दावा त्यांनी केला आहे. धनंजय मुंडे मला रोडवर सोडू शकत नाही मी त्यांची बायको आहे, आता मला बोलायचे असेल तर कॅबिनेटमध्ये येऊन बोलणार.करुणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडेंची सवय आहे की, फुट टाका आणि राज्य करा. स्वतः तोंड उघडत नाही आणि माझ्या मुलाला उभे केले. माझा मुलगा फ्रस्टेशनमध्ये होता. आमचे काही बरे वाईट झाले तर हा माणूस स्वतःला माफ करु शकणार आहे का? बापाच्या सांगण्यावरुन त्याने स्टोरी टाकली. माझ्या मुलाला किती कॉल येत होते हे सर्वांनी बघितले आहे.
संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरक आहे तो कुठे आहे त्याचं काय झालं याची काहीच माहिती समोर येत नाही. 50 दिवसांहून अधिक काळ लोटला तरी कृष्णा आंधळेचा पत्ता लागत नाही, त्याची हत्या झाली असावी असा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे.करुणा मुंडे पुढे बोलताना म्हणाल्या की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचा दोन महिने झाले तरी तपास लागत नाही. त्याला ठार मारले असेल असा दावा त्यांनी केला आहे. तर धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात माझ्याकडे बरेच काही बोलण्यासारखे आहे. त्यांच्याकडे आकाची कमी नाही म्हणतानाच त्यांच्या आर्थिक गडबडीची माहिती योग्य वेळ आली की बाहेर काढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.?
करुणा शर्मा पुढे म्हणाल्या की, ज्या वेळी माझ्या आईचं निधन झालं तेव्हा माझ्या कुटुंबावर दबाव टाकला. माझ्या बहिणीने केस टाकल्यावर माझ्यावर दबाव टाकला आणि सांगितलं की बहिणीची साथ देऊ नको म्हणून, तेव्हा मी बोलली नाही आता माझ्या मुलामुलींना माझ्याविरोधात तो उभं करत आहे. 1996 पासून काय-काय केलं हे मी सर्व सांगेल. जर माझ्या मुलांचा माझ्याविरोधात वापर केला तर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे सोबत काय केलं? काय कटकारस्थान रचले? मुंडे साहेबांविरोधात काय कटकारस्थान रचले गेले? किती आका आहेत? हे सगळं मी तोंड उघडणार आहे, असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय.

