पुणे, दि. ६ फेब्रुवारी: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विश्वरूप दर्शन आर्यभट्ट वेधशाळेच्या कॉसमॉस अॅस्ट्रॉनॉमी क्लबच्या वतीने नुकतेचे सहा अब्ज प्रकाशवर्ष दूर असलेल्या ‘पिल्लर्स ऑफ क्रिएशन, इगल नेबुला’ (गरूड तेजोमय निर्मितीचे स्तंभ) चा फोटो काढले. आज या फोटोची एक प्रतिमा एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या मूर्तीस अर्पण केला. ‘कॅासमॅास क्लब’ ह्या विद्यार्थी-शिक्षक क्लबचा आज प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. दीपक रानडे आणि गिरीश दाते उपस्थित होत.
या प्रसंगी विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” अखिल ब्रह्मांड हे ईश्वराचे प्रतिरूप आहे. हे तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वरांनी प्रतिपादलं होतं. आपल्या असामान्य बुद्धिमत्तेने आणि योगसामर्थ्याने विश्वाचे गुह्यज्ञान उलगडून सांगणार्या ज्ञानेश्वर माऊलींना ईगल नेब्यूलाचे छायाचित्र सादर करून कॅासमॅास क्लबच्या विद्यार्थ्यांनी अतिशय औचित्यपूर्ण कार्य केले आहे.”
या वेळी विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फिजिक्सचे विभाग एचओडी प्रसाद जोगळेकर, विभाग प्रमुख प्रा. अनघा कर्णे आणि विद्यार्थी टीमधील विद्यार्थी प्रतिनिधी ओजस धुमाळ, रोहित देशमुख, नमन अगरवाल, श्रेष्ठ गुप्ता, मल्हार झाडकर, अस्मित राय, पायल मोदी, वरूण नायर, अर्पणा सुब्रमण्यम, इमॅन्युअल आनंदन उपरणं, पदक आणि ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर खगोल निरीक्षणात रस असणार्या पुणेकर नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने‘ विश्वरूप दर्शन आर्यभट वेधशाळे’ला भेट द्यावी असे आवाहनही प्रा. कराड सरांनी केले.
एमआयटी विश्वशांती विद्यापीठांतर्गत ‘एमआयटी स्कूल अॅाफ कॅान्शसनेस अँड रिअॅलिटी’ या संस्थेमध्ये चैतन्यशक्तीचे विश्वात्मक स्वरुप यावर संशोधन केले जात आहे. सुप्रसिद्ध कॅन्सर संशोधक आणि वैज्ञानिक डॅा. जयंत खंदारे हे संस्थेचे प्रमुख असून, सुप्रसिद्ध न्यूरोलॅाजिस्ट आणि तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या तत्त्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. दीपक रानडे हे त्यांचे सहयोगी आहेत.
ब्रह्मांड दर्शनाचे निरीक्षण व अध्ययनासाठी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स च्या वतिने सुरू करण्यात आलेल्या ‘विश्वरूप दर्शन आर्यभट्ट वेधशाळे’ची निर्मिती एमआयटीच्या इकोपार्क टेकडीवर करण्यात आली. येथे एकूण तीन दुर्बीणी बसविण्यात आल्या आहेत. त्यात जीएसओच्या दोन दुर्बीण एक ८ इंची न्यूटोनियन आणि १० इंची रिचिक्रीशन आणि युनीस्टेलर इव्हीस्कोप टू ही दुर्बीण आहे. या वेधशाळेतून डीप स्काय इमेज घेता येता. यामध्ये चंद्र, नेबूला, ग्रह, तारे,गॅलेक्सी, ५० हजार वर्षातून एकदा दिसणार्या धूमकेतूनचे ही फोटो काढले आहेत.
