पुणे-शनिवार पेठेत चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून सात लाखांचा ऐवज पळविला आहे. येथील मंदार लॉज परिसरात एका अपार्टमेंटमध्ये सायंकाळी चोरट्यांनी घुसून ही घरफोडी केली आहे. तर, अन्य फ्लॅटमध्ये कडी कोयंडा तोडण्याचा प्रयत्न केला आहे.दरम्यान याप्रकरणी सरस्वती अपार्टमेंट येथे राहणाऱ्या ५६ वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चार फेब्रुवारीला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला नोकरी करतात. त्या मंदार लॉजच्या मागील सरस्वती अपार्टमेंट येथे राहतात चार फेब्रुवारीला सायंकाळी त्यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद होता. तेव्हा चोरट्याने फ्लॅटच्या बाहेरील लोंखडी ग्रीलच्या दरवाजाची कडी कोयंडा व कुलूप तोडून प्रवेश केला. नंतर घरात ठेवलेले ६ लाख ९७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली. दरम्यान, चोरट्याने याच अपार्टमेंट मधील अन्य एका फ्लॅटमध्येही चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.
शनिवार पेठेत भरदिवसा घरफोडी; तब्बल सातलाखांचा ऐवज चोरला
Date: