– प्रो लाईफ कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूटचा उपक्रम
पुणे:- कर्करोगाविरोधातील लढ्यात मोलाचे योगदान देत असंख्य रुग्णांना नवजीवन देण्याचे कार्य करणाऱ्या संस्थांना पुण्यातील प्रो लाईफ कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूट कडून एका विशेष कार्यक्रमात गौरविण्यात आले. जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून मंगळवारी या गौरव समारंभाचे आयोजन करणात आले होते.
प्रो लाईफ कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टीट्यूटचे प्रमुख डॉ. सुमित शहा यांच्या हस्ते या संस्थाचालकांना स्मृतीचिन्ह आणि मानपत्र देवून गौरविण्यात आले. गौरव करण्यात आलेल्या संस्थांमध्ये कॅन्सर पेशंट एड असोसिएशनच्या श्रीमती सप्रू मॅडम, नाग फाऊंडेशनचे डॉ. इनामदार, मुकुल माधव फाऊंडेशनचे जितेंद्र जाधव, जगेश रोकडे , केअर इंडिया मेडिकल सोसायटीच्या श्रीमती तस्लिमा मॅडम, हेल्पिंग हँड संस्थेच्या शैला नाईक , मुदिता – ॲन अलायन्स फॉर गिव्हिंग संस्थेचे माधव चव्हाण यांचा या गौरवमूर्तीमध्ये समावेश आहे.
या संस्था आणि संस्थाचालकांनी कॅन्सर विरोधातील लढाईमध्ये अमूल्य योगदान देत असंख्य रुग्णांना नवजीवन देण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्याची संधी आम्हाला मिळली याबद्दल प्रो लाईफ कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूट स्वतःला धन्य समजते अशा भावना डॉ. सुमित शहा यांनी यावेळेस व्यक्त केल्या.