पुणे, दि. ४ फेब्रुवारी : बालेवाडी येथे नुकतेच एसएफए टेबल टेनिस दुहेरी स्पर्धेत नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या युवा चॅम्पियन खेळाडू तनिष्क धमसानिया आणि सिद्धार्थ पॉल यांनी १५ वर्षाखालील मुलांच्या गटात कांस्य पदक पटकावले. खेळाडूंचा जोश आणि चिकाटी पाहून ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्रिन्सिपल संगीता राऊत यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
उपांत्य पूर्व फेरीत चौथा मानांकित
जोडीला ११/७,११/४ असा पराभव करून तनिष्क आणि सिद्धार्थ यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. या खेळाडूंनी अनेक मातब्बर स्पर्धकांना कडवी झुंज देत तृतीय क्रमांक पटकावला.
लहानपणापासून हे विद्यार्थी टेबल टेनिस खेळत आहेत. ते ध्रुव ग्लोबल स्कूलचे प्रशिक्षक नचिकेत देशपांडे यांच्याकडे या खेळाचे प्रशिक्षण घेत आहेत. आपल्या जबरदस्त खेळाच्या जोरावर अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी चमक दाखविली आहे.