पुणे-लष्कर परिसरात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यास चोरट्यांनी धारदार चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख रक्कम लुटली. याबाबत युवकाने लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध याबाबत लूटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार युवक लष्कर भागातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तो 3 फेब्रुवारी रोजी सकाळी पावणेसहाच्या सुमारास पूना काॅलेज परिसरातून दुचाकीवरुन जात होता. पूना काॅलेज परिसरातील रस्त्यावर दोन चोरट्यांनी त्याला अडविले. त्याला चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. युवकाला मारहाण करुन खिशातील 1200 रुपयांची रक्कम लुटून चोरटे पसार झाले. पोलिस उपनिरीक्षक राहुल घाडगे पुढील तपास करत आहेत.