पुणे : अभिजात संगीताचे गेली ४६ वर्षे जतन, संवर्धन करणाऱ्या गानवर्धन संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाइन वार्षिक शास्त्रीय गायन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
१८ ते २५ वयोगटासाठी आयोजित स्पर्धेत पुण्यासह नौपाडा, बेंगळुरू, मुरबाड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, जालना, सासवड येथून स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे परीक्षण गायिका अपर्णा पणशीकर, मंजुश्री ओक, डॉ. विद्या गोखले, डॉ. राजश्री महाजनी यांनी केले. तांत्रिक सहाय्य मुग्धा जोशी यांनी केले.
स्पर्धेतील विजेते : डॉ. श्रीरंग संगोराम स्मृती पुरस्कार : मयुरी अत्रे (पुणे), पंडिता रोहिणी भाटे स्मृती पुरस्कार : केदार खोंड (ठाणे), रमेश बापट पुरस्कृत पुरस्कार : सहाना हेगडे (बेंगळुरू), पंडित राम माटे स्मृती पुरस्कार : गणेश आलम (नांदगाव, मुरबाड), दत्तात्रय धोंडोपंत रत्नपारखी स्मृती पुरस्कार : भक्ती पवार (जालना/पुणे), पंडित त्र्यंबकराव जानोरीकर पुरस्कार : वैष्णवी जोशी (रत्नागिरी), भा. वा. राडकर परिवार विशेष कलाकार पुरस्कार : पियुषा भोसले (सातारा).
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवार, दि. १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजता एस. एम. जोशी सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.