मोफत विवाहसाठी नोंदणी करण्याचे आवाहन
पुण्यात होणार १५ मार्च २०२५ ला भव्य बिगर हुंडा भव्य सामूहिक विवाह सोहळा
पुणे – आजच्या काळात जास्तीत जास्त सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणे समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत. कारण यामुळे विवाह समारंभांमध्ये होणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाचतो. सामूहिक विवाह सोहळे आज समाजासाठी एक प्रेरणास्रोत बनले आहेत. या अनुषंगानेच अग्रसेन भगवान चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने दि. १५ मार्च २००५ रोजी गरीब आणि गरजू कुटुंबातील युवक-युवतींसाठी एक बिगर हुंडा सामूहिक विवाह समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध समाजसेवक रतनलाल गोयल यांच्या ७१व्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित हा विवाह सोहळा अगदी थाटात हिंदू धर्मातील रितीरिवाजानुसार तथा धार्मिक परंपरेनुसार होणार आहे. या सोहळ्यात लग्न करणाऱ्या जोडप्यांना लाखो रुपयांच्या संसारोपयोगी वस्तू दिल्या जातील. गरीब आणि गरजू विवाहेच्छुक जोडप्यांनी या सोहळ्यासाठी लवकरात लवकर मोफत नोंदणी करावी, असे आवाहन रतनलाल गोयल आणि राजेश अग्रवाल यांनी केले आहे.
या समारोहासंदर्भात माहिती देताना रतनलाल गोयल आणि राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, आज आपण अशी अनेक कुटुंबे पाहतो जिथे घरात लग्न झाल्यानंतर माता-पिता हे कर्जामध्ये बुडतात. कुठल्याही माता-पित्यावर ही स्थिती येऊ नये, यासाठी सामूहिक विवाह समारोह ही आजच्या काळाची गरज बनले आहेत आणि हीच खरी मानव सेवा आहे.
या बिगर हुंडा सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांना घरात लागणारे विविध प्रकारचे साहित्य जसे कि, कपाट, पलंग, गादी, चादर, टेबल पंखा, मिक्सर, देवघर, भांडी-कुंडी दिली जाणआर आहेत. याशिवाय वर-वधूचे कपडे, वधूचे मंगळसूत्र, तोरड्या तसेच जोडवी दिली जातील.
१५ मार्चला गंगाधाम रोडवर स्थित आईमाता मंदिरासमोरील गोयल गार्डन येथे हा विवाह सोहळा आयोजित केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी नोंदणी पूर्णपणे मोफत असून, ही नोंदणी करण्यासाठी 9049992560, 9422025049 या नंबर वर संपर्क साधावा.
या सोहळ्यात लग्न करणारे वर-वधू हे सज्ञान असणे आवश्यक आहे, तसेच वर-वधू यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची या लग्नाला संमती असणे गरजेचे आहे, अशी माहिती रतनलाल गोयल आणि राजेश अग्रवाल यांनी दिली.