पुणे, दि. १ फेब्रुवारी २०२५ : शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे जिल्ह्यातील महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी डॉ. गोऱ्हे यांनी नव्या सदस्यांचे पक्षात स्वागत करत त्यांना शिवसेनेच्या विचारधारेचे आणि महिला सक्षमीकरणाच्या भूमिकेचे मार्गदर्शन केले.
या पक्ष प्रवेश सोहळ्यात बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “शिवसेना हा महिलांच्या सशक्तीकरणासाठी लढणारा पक्ष असून, महिलांनी समाजकारण आणि राजकारणात सक्रीय भूमिका घेतली पाहिजे. पक्षाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम आणि संधी उपलब्ध करून दिल्या जातील.”
शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि विकासात्मक उपक्रम राबवले जातील, असा विश्वास नव्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे पुणे उपशहर प्रमुख श्री. सुधीर कुरुमकर, पुणे जिल्हा सह संपर्कप्रमुख श्रीमती सुदर्शना त्रिगुणाईत, पुणे शहरप्रमुख श्रीमती सुरेखा कदम-पाटील, पुणे उपजिल्हाप्रमुख श्रीमती वैशाली काळे, पुणे जिल्हाप्रमुख श्रीमती सीमा कल्याणकर, शिवसेना कार्यालयीन प्रमुख श्री. सुधीर जोशी आणि स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.