पुणे : महाराष्ट्रातील २५०० हून अधिक सामाजिक संस्थांची महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातील संस्था अध्यक्ष सचिव पदाधिकारी व प्रतिनिधींसाठी ऑनलाईन कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांनी अध्यक्षीय भाषणात सीएसआर प्रकल्प करणे का महत्वाचे आहे व सामाजिक संस्थांना कसे एकत्र येऊन असे प्रकल्प राबविता येतील यावर मुद्देसुद विचार मांडले. प्रस्तावना ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे यांनी केली. सीएसआर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामध्ये विजय वरुडकर (सीईओ सीएसआर हेल्पलाईन संयोजक राष्ट्रीय कर्तव्य अभियान) यांनी सीएसआर प्रकल्पासाठी संधी उपलब्धता,आणि रोस्ट्रम इंडिया ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष वैभव मोगरेकर यांनी सीएसआर प्रकल्प व्यवस्थापन आणि अंमलबजावणी आणि महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे यांनी सोशल इम्पॅक्ट असेसमेंट याविषयावर सादरीकरण व मार्गदर्शन केले.
महाराष्ट्रातील सामाजिक संस्था यांना सीएसआर प्रकल्पासाठी येणाऱ्या अडचणी यावर चर्चा करून पुढे काय उपाययोजना करता येतील यावर प्रामुख्याने चर्चा झाली ह्या चर्चासत्राचे आयोजन महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे, संचालक योगेश बजाज, अपूर्वा करवा आणि कोमल गांधी यांनी केले होते महा एनजीओ फेडरेशनच्या
संस्थांचे प्रतिनिधी ह्या ऑनलाईन कार्यशाळेस बहुसंख्येने उपस्थित होते.