वीजबंद मागे; शिवाजीनगर, डेक्कन भागात आज शनिवारी वीजपुरवठा नेहमीप्रमाणे सुरु राहणार

Date:

पुणे, दि. ३१ जानेवारी २०२५ : शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील पुणे मेट्रो व महापारेषणच्या अतिउच्चदाब वीजवाहिन्यांच्या अत्यावश्यक कामांसाठी महापारेषणच्या तीन अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार होता. मात्र हे पूर्वनियोजित काम पुढे ढकलण्यात आले असून शनिवारी (दि.१ फेब्रुवारी) शिवाजीनगर, गणेशखिंड व डेक्कन परिसरातील वीजपुरवठा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.

शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे. या मार्गावरील महापारेषणच्या १३२ केव्ही भूमिगत वीजवाहिन्यांचे काम करण्यात येत आहे. त्यासाठी २२०/१३२ केव्ही गणेशखिंड व चिंचवड उपकेंद्र आणि कोथरूडमधील जीकेआरएस अतिउच्चदाब उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार होता. त्यामुळे शनिवारी (दि. १ फेब्रुवारी) सकाळी ८ ते सायंकाळपर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार असल्याचे शिवाजीनगर, डेक्कन, गणेशखिंड भागातील नागरिकांना कळविण्यात आले होते. मात्र हे काम स्थगित करण्यात आले असून शनिवारी (दि. १ फेब्रुवारी) २२०/१३२ केव्ही गणेशखिंड व चिंचवड उपकेंद्र आणि कोथरूडमधील जीकेआरएस उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरु राहणार आहे. त्यामुळे महावितरणच्या सर्व उपकेंद्रांसह शिवाजीनगर, गणेशखिंड, डेक्कन आदी भागातील वीजपुरवठा नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबई महापालिकेत ४४ वर्षांनंतर भाजपाचा महापौर, श्रीमती रितू तावडे महापौरपदी विराजमान

मुंबई, दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ बृह्नमुंबई महानगरपालिकेच्या महायुतीचं सरकार आल्यानंतर...

‘एन. ए.’ परवानगी आता इतिहासजमा..बांधकाम नकाशा हीच एन. ए. परवानगी,जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची संपली गरज

महसूलमंत्र्यांची जमीन महसूल कायद्यात महत्वाची सुधारणा-राजपत्र जारी....मुंबई. दि. ११...

‘इंटरनॅशनल अ‍ॅग्री हॅकाथॉन इन पुणे २०२६’ चे १५ ते १७ मे दरम्यान भव्यस्वरुपात आयोजन- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे शहर कृषी-तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित होण्याच्या दिशेने सज्ज विजेत्यास...