पुणे: जागतिक स्तरावर वाहन उद्योग क्षेत्रातील तीस अग्रगण्य कंपन्यांपपैकी एक अशा माहले ग्रुप जर्मनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अर्न्ड फ्रांझ यांच्या प्रेरणादायी भेटीने एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना नवीन दृष्टिकोन व आव्हाने पेलण्याची उर्मी मिळाली. विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या प्रमुख सत्रात त्यांनी त्यांच्या यशस्वी प्रवासाची कहाणी व नाविन्यतेसाठी त्यांची दृष्टी मांडली. त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना नवीन कल्पना आत्मसात करण्याची प्रेरणा मिळाली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या प्रश्नोत्तर सत्राने विशेष आकर्षण निर्माण केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री. फ्रांझ यांनी मुद्देसूद आणि मार्गदर्शक उत्तरे दिली, ज्यामुळे उपस्थित श्रोत्यांवर सकारात्मक प्रभाव पडला. या भेटीचा वैशिष्ठ म्हणजे “व्हेगापॉड हायपरलूप” क्लबच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन श्री. अर्न्ड फ्रांझ आणि इतर मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. याशिवाय, श्री. फ्रांझ यांनी माहले गटाच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे सखोल परीक्षण केले. यामध्ये व्हेगापॉड हायपरलूपच्या नाविन्यपूर्ण प्रोटोटाइप आणि पिरान्हा रेसिंगच्या सर्वभूमी वाहन प्रकल्पांचा समावेश होता. त्यांनी या प्रकल्पांवर तांत्रिक आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून मौलिक सूचना देऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यामध्ये अधिक सुधारणा करण्यास प्रोत्साहित केले. विद्यापीठाच्या परंपरेनुसार श्री. अर्न्ड फ्रांझ, श्री. डॉ. रॉजर बुश – उपाध्यक्ष (सेल्स व इंजिनिअरिंग), श्री. मिलिंद गोडबोले – अध्यक्ष, माहले इंडिया, श्री.आशुतोष देशपांडे -अभियांत्रिकी सेवा प्रमुख तथा जोजी फिलिप्स- संचालक मानव संसाधन यांचे भारतीय संस्कृती नुसार स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजक आणि अभियांत्रिकी तथा तंत्रज्ञान संकुलाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. गणेश काकांडीकर यांनी युनिव्हर्सिटीबद्दल विस्तृत सादरीकरण केले. एमआयटी आणि माहले ग्रुप यांचा प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीत परस्पर सहकार्यातून विद्यार्थ्यांचा विकास कसा साधता येईल यावर चर्चा झाली. यावेळी माननीय कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, कुलसचीव प्रा. गणेश पोकळे, अभियांत्रिकी तथा तंत्रज्ञान संकुलाचे अधिष्ठाता डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती, संगणक विज्ञान तथा अभियांत्रिकी संकुलाचे अधिष्ठाता डॉ. मंगेश बेडेकर, यंत्र अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. शिवप्रकाश बर्वे, विद्यार्थी प्रकल्प प्रमुख डॉ. दीपक हुजरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. ओंकार कुलकर्णी, डॉ. चेतन पाटील, प्रा. श्रीकांत यादव, डॉ. आशिष उटगे, डॉ. आशिष पवार, डॉ. प्रशांत पाटने, प्रा. हेरंब फडके, डॉ. गणेश बोरीकर, प्रा. स्नेहल कोळेकर, प्रा. सचिन देशमुख, प्रा. प्रल्हाद पेसोडे, डॉ. कौस्तुभ कुलकर्णी, डॉ. प्रशांतकुमार, डॉ. विवेक पटेल, प्रा. अरुण माळी, डॉ. मिटुल सोळंकी, प्रा. मंगेश सराफ, डॉ. वैदेही साहू, डॉ. दीपक कुमार, डॉ. अभिषेक थोटे, प्रा. रवींद्र पवारकर सहायक कुलसचिव श्री, प्रदीप चाफेकर, श्रीमती सुलभा वाले यांनी परिश्रम घेतले.