पुणे-
केंद्रीय जीएसटी व सीमाशुल्क, पुणे क्षेत्रातर्फे आज व उद्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक मंडळाद्वारे (पश्चिम विभाग) या स्पर्धा होत आहेत.
पाषाण, पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था अर्थात आयसर मध्ये या क्रीडा स्पर्धा होत आहेत. आज मयंक कुमार, आयआरएस, मुख्य आयुक्त, सीजीएसटी आणि सीमाशुल्क, पुणे क्षेत्र यांच्या हस्ते या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन झाले. के. आर. उदय भास्कर, आयआरएस, प्रधान मुख्य आयुक्त, सीजीएसटी, मुंबई, हॉकीपटू पद्मश्री धनराज पिल्ले व प्रा. सुनील भागवत, संचालक, आयआयएसईआर, पुणे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

डावीकडून उजवीकडे- के. आर. उदय भास्कर, मुख्य आयुक्त CGST मुंबई क्षेत्र, मिहिर कुमार, प्रधान आयुक्त, मयंक कुमार, CGST पुणे विभाग, पदमश्री डॉ. धनराज पिल्ले, प्रा. सुनील भागवत
अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, फुटबॉल, क्रिकेट स्क्वॅश, लॉन टेनिस अशा 17 क्रीडा स्पर्धांचा समावेश या क्रीडा स्पर्धांमध्ये आहे. या स्पर्धेमध्ये गुजरात, गोवा तसेच महाराष्ट्रातील केंद्रीय जीएसटी, सीमाशुल्क व आयकर विभागाचे सहाशेहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत.



