पुणे– शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आज काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्याचबरोबर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने संविधानाच्या रक्षणार्थ ‘जय बापू’, ‘जय भीम’, ‘जय संविधान अभियान’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदरची रॅली काँग्रेस भवन ते लोकमान्य टिळक पुतळा, म. फुले मंडई पर्यंत काढण्यात आली.
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘देशातील सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही, सर्व धर्म समभाव आणि सामाजिक समता ही मूल्य संविधानाने आपल्याला दिलेली आहेत. किंबहुना आपले संविधान हेच आपली खरी ओळख आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या या संविधानाची मोडतोड काही धर्मांध शक्ती करू पाहत आहेत मात्र देशातील कष्टकरी, मागासवर्गीय, भटके विमुक्त, गरीब, दलित, अल्पसंख्यांक, महिला, युवक हे सारे या धर्मांध शक्तींचा डाव उधळवून लावतील आणि संविधानाचे रक्षण करतील.
भारतीय संविधान म्हणजे संतविचार-शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचा संगम आहे. परंपरा, संस्कृती, भाषा, जात, धार्मिक श्रद्धा, खाद्यपदार्थ इत्यादींमध्ये वेगळेपण असलेल्या ४,००० हून अधिक समुदायांनी भारत देश बनलेला आहे. भारत हा जगातील पहिला देश आहे ज्याने स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच महिलांसह सर्व प्रौढांना मतदानाचा हक्क दिला. काँग्रेस पक्षाच्या वतीने भारताचे संविधान वाचविण्यासाठी रॅलीचे आयोजन केले आहे.’’
यावेळी यावेळी शहराध्यक्ष अरविंदजी शिंदे यांच्या सह माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, NSUI चे माजी प्रदेशाध्यक्ष आमीर शेख, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी नगरसेवक अजित दरेकर, अविनाश बागवे, रफिक शेख, मुख्तार शेख, सदानंद शेट्टी, अविनाश साळवे, कैलास गायकवाड, राज अंबिके, विनोद रणपिसे, सीमा सावंत, प्राची दुधाने, माया डुरे, अनिता धिमधिमे, सुंदर ओव्हाळ, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सुजित यादव, ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, संतोष पाटोळे, अक्षय माने, रमेश सोनकांबळे, राजु ठोंबरे, रमेश सकट, अजित जाधव, सेवादलाचे प्रकाश पवार, द. स. पोळेकर, भूषण रानभरे, महेश हराळे, आबा जगताप, देवीदास लोणकर, गणेश शेडगे, ज्योती परदेशी, हर्षद हांडे, भगवान कडू, नुर शेख, सुरेश नांगरे, वाल्मिकी जगताप, अमित कांबळे, सचिन भोसले, बाळासाहेब बाणखेले, अभिजीत महामुनी, व इतर सहकारी पदाधिकारी उपस्थित होते.

