मनात आणि अंतर्मनात सकारात्मक विचारांची पेरणी होणे गरजेचे – सरश्री
पुणे-
प्रख्यात आध्यात्मिक गुरु व लेखक सरश्री यांचा “जाणूनबुजून आपला मूड कसा सुधारायचा” हा आध्यात्मिक कार्यक्रम सिंहगड रोड येथील मनन आश्रम येथे मोठ्या उत्साहात पार पडला. हजारोंच्या संख्येने नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी सरश्री यांनी उपस्थित अनुयायांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, की छोट्या छोट्या गोष्टीतून अनेक लोकांचा मूड ऑफ होत असतो. तो मूड सुधारण्यासाठी कोणत्या क्लुप्त्या वापरायच्या, त्याचे तंत्र त्यांनी सांगितले.
बरेच लोक मूड चांगला करण्यासाठी आल्याच्या चहाचे सेवन करतात. त्यांचा असा समाज आहे, की आल्याचा चहा प्यायल्याने खराब झालेला मूड देखील चांगला होतो. मात्र मूड चांगला करण्यासाठी मनात आणि अंतर्मनात सकारात्मक विचारांची पेरणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमितपणे ध्यान करणे गरजेचे आहे. त्याने आपल्या जीवनात आमूलाग्र बदल होतील. मनाची मशागत होणे गरजेचे आहे. मनावरील ताण तणाव कमी करता आला पाहिजे.
आजकाल प्रत्येक माणसाला पटकन राग येतो. तो दिसेल त्याच्यावर तो ओरडत असतो. घरात, कार्यालयात, रस्त्यावर म्हणजे सर्वच ठिकाणी रागाचे प्रमाण वाढले आहे ? रागाची व्याप्ती, त्याची कारणे समजून घ्या. राग न येण्यासाठी त्याच्यावरील उपाय काय करायचे, ते समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही स्वतःशी मनन, चिंतन, विचारमंथन, आत्मविश्लेषण करणे गरजेचे आहे. राग हा विनाशी आहे. तो क्षणात विनाशाकडे घेऊन जातो, म्हणूनच रागापासून मुक्त व्हा, त्याशिवाय आपल्याला योग्य दिशा मिळणार नाही.