पुणे –
मकर संक्रांती निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी महिला आघाडी आयोजित ‘‘तिळगुळ व हळदी-कुंकू समारंभ’’ काँग्रेस भवन येथे महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये साजरा करण्यात आला.माजी आमदार दिप्ती चवधरी यावेळी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून शकुंतला खटावकर (पहिल्या अर्जुन पुरस्कार विजेत्या, कबड्डी), कादंबरी शेख (ट्रान्स वुमन, सामाजिक कार्यकर्त्या), अमृता गुजर (वास्तुशास्त्र तज्ञ), डॉ. स्वाती बढिये, निला नरेंद्र व्यवहारे, सविता एस. या उपस्थित होत्या. या प्रमुख पाहुण्यांचा सन्मान कार्यक्रमाच्या आयोजकांनी केला.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांचा सपत्नीक सत्कार ही यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका व सामाजिक कार्यकर्त्या मेघना झुझम यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातून प्रबोधनात्मक कृतिशील विचारातून परिवर्तनशील हळदी-कुंकू समारंभ कसा असावा या विषयी त्यांनी उपस्थित महिलांना माहिती दिली.
मा. अरविंद शिंदे यांनी सर्व उपस्थित माता भगिनींचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राची दुधाने यांनी केले तर आभार प्रदर्शन सीमा सावंत यांनी केले. यानंतर उपस्थित महिलांना हळद-कुंकू लावून वाण देण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन प्राची दुधाने, सीमा सावंत, अनिता धिमधिमे, सुंदर ओव्हाळ, प्रियांका मधाळे, माया डुरे, कांचन बालनायक, ज्योती चंदेवाल, व सहकाऱ्यांनी केले होते.
कार्यक्रमप्रसंगी माजी नगरसेवक रफिक शेख, डॉ. स्नेहल पाडळे, बाळासाहेब दाभेकर, मेहबुब नदाफ, बाळासाहेब अमराळे, द. स. पोळेकर, राज अंबिके, विल्सन चंदेवाल, ॲड. रमेश पवळे, सुरेश नांगरे, शाम काळे, ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, अक्षय माने, संतोष पाटोळे, विशाल जाधव, किशोर मारणे, रेखा घेलोत, कविता भागवत, नुर शेख आदीसंह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

