मानवी गुणांनी युक्त असणे हीच मानवाची खरी ओळख होय–सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज
पिंपरी (पुणे) 24 जानेवारी, 2025 मनुष्य रुपात जन्म प्राप्त केल्यानंतर मानवीय गुणांनी युक्त असणे हीच मानवाची खरी ओळख होय असे उद्गार सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाध्या शुभारंभ प्रसंगी मानवतेच्या प्रति संदेश देताना व्यक्त केले.
या तीन दिवसीय संत समागमामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्तगण व प्रभुप्रेमी सज्जनांनी भाग घेतला आहे.सतगुरु माताजी यांनी पुढे सांगितले, की विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारे सांसारिक उपलब्धिच्या बाबतीत मानवाने खूपच प्रगती आणि विस्तार केला आहे. जेव्हा सद्बुद्धीने युक्त होऊन या उपलब्धिचा वापर केला जातो तेव्हा तो निश्चितच मानवासाठी शांतीसुखाचे कारण बनतो. परंतु जर यांचा सदुपयोग केला नाही तर त्या उपलब्धी मानवासाठी नुकसानकारक ठरतात. ब्रह्मज्ञानाद्वारे जेव्हा परमात्म्याला जीवनात उत्तरविले जाते तेव्हा सहजपणेच मानवाला सुमती प्राप्त होते, त्याच्या मनातील आप पर भाव नाहीसा होतो आणि प्रत्येक मानवासाठी त्याच्या मनात परोपकाराचा भाव उत्पन्न होतो. मानवाने शुद्ध भावनेने या परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये स्थान द्यावे ज्यायोगे प्रत्येक मानवाच्या प्रति त्याच्या मनामध्ये प्रेम व सेवेचा भाव उत्पन्न होऊ शकेल .
तत्पूर्वी आज सकाळी मिलिटरी डेअरी फार्मच्या विशाल मैदानांवर सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या दिव्य आगमनाचे औचित्य साधुन श्रद्धालु भक्तांनी एका भव्य शोभायात्रेचे आयोजन केले ज्यामध्ये एका बाजुला भक्तांनी आपल्या हृदयसम्राट सद्गुरुंचे भावपूर्ण स्वागत केले तर दुसऱ्या बाजुला मिशनच्या शिकवणूकीवर आधारित महाराष्ट्र तसेच भारताच्या वेगवेगळ्या संस्कृतींचे अद्भूत मिलन दर्शविणान्या चित्ररथ स्वरूप कार्यक्रमांची सुंदर दृश्ये प्रस्तुत केली जी प्रेक्षकांच्या आकर्षणाचे कारण ठरली.
या शोभायात्रेत मिशनची विचारधारा आध्यात्मिकतेचे महत्व, मानव एकता व विश्वबन्धुत्वाच्या भावनेचा विस्तार आदि विषयावर प्रकाश टाकण्यात आला. त्यामध्यें विस्तार अनंताच्या दिशेने सदगुणांचा विस्तार ब्रह्माची प्राप्ति-भ्रमाची समाप्ती, प्रत्येक भाषा, प्रत्येक देशाचे सारे मानव आपलेच असती. सारे मिळून प्रेममय जग बनवुया, आपुलकीची भावना, खेळा आणि हसाही, नर सेवा, नारायण पूजा, स्वच्छ जल स्वच्छ मन इत्यादि प्रेरणादायक ठरले, या प्रस्तुती सादर करणा-यामध्ये महाराष्ट्राच्या पुणे, कोल्हापुर मुंबई, नाशिक, त्तातारा, धुळे, अहिल्या नगर, छत्रपती संभाजी नगर नागपुर, रायगड, सोलापुर तसेच इतर राज्यापैकी हैद्राबाद येथील भक्तगणानी भाग घेतला.
दिव्य युगुलाचे भव्य स्वागत
समागम स्थळावर आगमन होताच सतगुरु माता जी आणि आदरणीय निरंकारी राजपिताजी यांचे समागम समितीच्या सदस्यांनी व मिशनच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी पुष्पमालांनी व पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले. त्यानंतर दिव्य युगुलाला समागम मडपाच्या मधून मुख्य मंचापर्यंत एका फुलांनी सुसज्जित खुल्या वाहनातून नेण्यात आले. यावेळी उपस्थित भक्तगणानी धन निरकारच्या जयघोषानी आपला आनंद व्यक्त करत दिव्य युगुलाचे हात जोडून अभिवादन केले. सतगुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी यानी भाविक भक्तगणांच्या या भावनांचा सहर्ष स्वीकार केला आणि सुहास्य वदनाने त्यांना आपले आशीर्वाद प्रदान केले.