पुणे,: सुमारे चार दशकांचा वारसा लाभलेल्या EPC आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील लिस्टेड नेतृत्व असलेल्या वॅसकॉनइंजिनीअर्स लि.ने कल्याणी नगर, पुणे येथील आपल्या वॅसकॉनमूर्ती स्नेहधामचा पहिला वर्धापन दिन साजरा केला.
60 आणि त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांचे जीवन समृद्ध करण्यासाठी वॅसकॉनमूर्थी फाउंडेशनने गेल्या वर्षी वॅसकॉनमूर्थी स्नेहधाम सुरू केले. हे ज्येष्ठ नागरिकांना आपल्या समविचारी लोकांशी जोडण्यास मदत करते. सेवा आणि समाजबंधाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित महत्त्वाच्या कार्यक्रमाला सर्व सदस्य, पाठीराखे आणि हितचिंतकांनी आनंदाने हजेरी लावली.
वॅसकॉनमूर्थी स्नेहधामचा पहिला वर्धापन दिन सोहळा हा आनंद, सौहार्द आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेने भरलेला एक हृदयस्पर्शी कार्यक्रम होता. प्रख्यात मराठी गायिका राजश्री ताम्हणकर यांनी त्यांच्या प्रतिभावान सहगायकांसोबत सादर केलेला कार्यक्रम हे या संध्याकाळचे खास आकर्षण. त्यांच्या भावपूर्ण स्वरांनी वातावरण मंत्रमुग्ध झाले, ज्यात श्रोते देखील रंगून गेले. हा कार्यक्रम गेल्या वर्षभरात वॅसकॉनमूर्थी स्नेहधामने ज्येष्ठांसाठी किती महत्त्वाचे आणि प्रेरणादायी काम केले आहे, याचा पुरावा होता. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना समाजात राहण्याचा आनंद तर मिळालाच पण सारखेच वय असलेल्या वृद्धांचा सहवास आणि पाठिंबा मिळाला. या कार्यक्रमाची सांगता टाळ्यांच्या गजरात झाली आणि आगामी वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करण्याच्या नवीन वचनबद्धतेने आणि ऊर्जेने संध्याकाळची सांगता झाली.
यावेळी वॅसकॉनग्रुपच्या रम्या मूर्ती आणि स्नेहधामच्या संस्थापक डॉ. सविता नाईकनवरे यांनी समाजाकडून मिळालेला पाठिंबा तसेच पाठबळाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
डॉ. नाईकनवरे म्हणाल्या, “हा प्रवास अतुलनीय आहे. केवळ एका वर्षात, आम्ही अनेकांचे जीवन स्नेहाने उजळून टाकले. वॅसकॉनमूर्थी स्नेहधाम हे ज्येष्ठांच्या कल्याणासाठी आणि आनंदासाठी समर्पित आहे. या माध्यमातून वृद्धांना समृद्ध सामाजिक, वैचारिक आयुष्य उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे.”
वॅसकॉनइंजिनीअर्स लिमिटेडचे अध्यक्ष एमेरिटस श्री. आर. वासुदेवन पुढे म्हणाले: “समाजातील ज्येष्ठांसाठी वॅसकॉनमूर्थी स्नेहधाम आनंद देणारा आणि काळजी घेणारा बनला आहे, हे पाहून मला खूप आनंद होतो. हे केंद्र केवळ मजामस्करी करण्याचे ठिकाण नाही तर एक अशी संस्था आहे, जिथे आपल्या ज्येष्ठांना आनंद, सहवास आणि काळजी मिळते. आमच्या सर्व सदस्यांना हे घरच वाटेल, अशी जागा निर्माण करण्याचा आमचा हा प्रवास सुरू ठेवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”
60 आणि त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांचे जीवन समृद्ध करण्यासाठी वॅसकॉनइंजिनीअर्सचा सीएसआर उपक्रम वॅसकॉनमूर्थी फाउंडेशनने गेल्या वर्षी वॅसकॉनमूर्थी स्नेहधाम सुरू केले. 58 नोंदणीकृत सदस्यांसह, हा उपक्रम मनोरंजन आणि आरोग्यसेवा मार्गदर्शनाचे एक अनोखे मिश्रण देते, ज्यामुळे परस्परांची सवय होतानाच एकीची भावना, समाज भावना वाढीस लागते. कला आणि संगीत वर्ग, ज्येष्ठांसाठी तयार केलेले फिटनेस कार्यक्रम, व्होकल आणि कराओके परफॉर्मन्स, फेस्टिव्हल सेलिब्रेशन आणि मूव्ही स्क्रीनिंग यांसारख्या पर्यायांसह विविध अनोख्या गोष्टींमध्ये सदस्य सहभागी होतात. चेअर योगा आणि डान्स थेरपी यांसारख्या वेलनेस ॲक्टिव्हिटी शारीरिक आणि भावनिक सक्रियता वाढवतात तर नृत्य परफॉर्मन्स, स्टोन पेंटिंग कार्यशाळा आणि नॉस्टॅल्जिक बायोस्कोप सत्रे असे सांस्कृतिक कार्यक्रम स्नेहधामच्या समृद्ध अनुभवांमध्ये सर्जनशीलता जोडतात.