पुणे-९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना अंतर्गत सरहद ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गुजर निंबाळकरवाडी शाळेचा, कात्रज येथील सरहद संस्थेच्या मुख्य शाखेमध्ये भावगीत, गवळण, नाट्य गीत, अभंग, लावणी या गीत प्रकारांनी नटलेला *हे *सुरांनो चंद्र व्हा** हा संगीतमय कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या मुख्य गायिका सौ .मनिषा वाडेकर यांनी आपल्या सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.हे सुरांनो चंद्र व्हा या शिर्षक गीताने वातावरण संगीतमय झाले.सहगायक अशोक लांडगे ,मोना भोरे, सुदाम कुंभार, अर्पिता कठाळे, इरा देशपांडे, राजू चांदगुडे यांनी विविध प्रकारची भक्तिगीते , भावगीते, गवळण व युगल गीते सादर केली. रोहित ठाकूर व आदेश जाधव यांची तबल्याची जुगलबंदी रसिकांना आवडली..या अप्रतिम संगीताच्या मेजवानीने व गायकांच्या बहारदार सादरीकरणाने स्वरसाज चढविला. हा स्वर मनात रुंजी घालून गेला. वाद्यवृंदांमध्ये संगीतकार अजय कांबळे व अनिकेत नलावडे यांनी की बोर्ड, राजू चांदगुडे यांनी हार्मोनियम, रोहित ठाकूर व आदेश जाधव यांनी तबला साथसंगत केली. प्रमुख अतिथी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी सरहद संस्थेने साहित्य संमेलनाचा आयोजक पद स्वीकारल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले, तसेच भावी उपक्रमास शुभेच्छा दिल्या . कर्तव्य दक्षतेची भूमिका पार पाडत असताना व्यस्त जीवनशैलीत आज सुरेल गीतांनी मन प्रफुल्लित झाले असेही मत त्यांनी व्यक्त केले. तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कवी गोपाळ कांबळे, संस्थापक स्वरगंधार, पुणे, तसेच धनंजय पुरकर संचालक डीएसपी प्रोडक्शन व संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर , अनुज नहार, अभय नहार, शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मला नलावडे, प्राथमिक विभाग प्रमुख कोमल दिवटे, सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या सचिव सुषमा नहार यांनी मार्गदर्शन केले. निवेदन शितल सदामते व श्रीराज भोर यांनी केले .माऊली माऊली या सामूहिक गजराने कार्यक्रमाची सांगता झाली.
‘हे सुरांनो चंद्र व्हा’ संगीतमय कार्यक्रम उत्साहात संपन्न.
Date:

