पुणे-ऑल आर्टिस्ट फाउंडेशनच्या वतीने कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांची राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री आणि सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, आपली संस्कृती, कला जोपासलीच पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे. त्यासाठी कलाकार हे सातत्याने प्रयत्नशील असतात. ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन ही कलाकारांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते, त्यामुळे अशा संस्थेला माझे नेहमीच सहकार्य असते, अशी भावना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र
यांचे कार्याध्यक्ष अविनाश खेडकर, अध्यक्ष योगेश सुपेकर, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,उपाध्यक्ष गणेश गायकवाड सचिव गणेश मोरे, खजिनदार रशीद शेख उपखजिनदार मनोज माझीरे, संचालक सोमनाथ फाटके प्रमुख सल्लागार संदीप पाटील, विशेष सल्लागार अभय गोखले आदी पदाधिकारी उपस्थित होते.