अहमदाबाद, गुजरात – २३ जानेवारी २०२५ –
देशातील फार्मा कंपन्यांमधील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखल्या जाणा-या एमक्युअर फार्मा कंपनीने गुजरात येथे जागतिक दर्ज्याचे संशोधन विकास केंद्र उभारलण्याची घोषणा केली. अहमदाबाद येथील तपोवन सर्कल येथे हे केंद्र उभारले आहे . गुजरात येथील एमक्युअर रिसर्च सेंटर या नावाने हे संशोधन विकास केंद्र ओळखले जाईल. एमक्युअर रिसर्च सेंटर (ईआरसी) येथे शाश्वत जगतातील विविध आजारांवरील औषध संशोधन फार्म्यूला, लिपोसोमल इंजेक्शन आणि अत्याधुनिक त्वचेसंबंधी थेअरपी आदी औषधांमधील वितरण प्रणाली विकसित करण्यात आल्या आहेत. गुजरातचे आरोय आणि कुटुंबकल्याण मंत्री श्री. ऋषिकेश पटेल यांच्या हस्ते ईआरसी केंद्राचे उद्घाटन झाले. या सोहळ्यातून एमक्युअर कंपनी ही औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधन आणि विकासाबाबत कटिबद्ध असल्याचा सर्वांना परिचय झाल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले.
अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि प्रगत साधनसामग्रीच्या मदतीने नवे ईआरसी केंद्र नवनव्या संशोधनासाठी सज्ज झाली आहे. हे केंद्र जागतिक नियामक मानांकनचे पालन करते. यात प्रामुख्याने अगदी सुरुवातीच्या टप्प्यातील पूर्व-फॉर्म्यूलेशन अभ्यास ते स्केलिंगपर्यंत औषधनिर्मिती क्षेत्रातील विकासाचे सर्व पैलूंवर काम केले जाईल.
फार्माक्युटिकल सायन्स, बायो-इंजिनिअरिंग, एनालिटिकल केमिस्ट्री, फार्माकोव्हिजिलन्स आणि रेग्युलेटरी अफेअर्समध्ये डॉक्टरेट, पदवीधर, पदव्युत्तर अशा ३५० कुशल व्यावसायिकांची टीम नवीन फॉर्म्युलेशन विकसित करण्यासाठी काम करेल. ही टीम औषध जैवउपलब्धता वाढवण्यासाठी तसेच रुग्णकेंद्रीत वितरण सेवा तयार करण्यासाठीही कार्यरत असेल.
ईआरसी केंद्राचे उद्घाटन करताना गुजरातचे माननीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री श्री. ऋषिकेश पटेल म्हणाले, ‘‘अहमदाबाद येथे एमक्युअर फार्माक्युटिकल्सच्या अत्याधनिक संशोधन विकास केंद्राचे उद्घाटन करताना मला खूप अभिमान वाटतोय. गुजरात राज्य सदैव नवनव्या प्रगतीपथाचे केंद्र राहिले आहे. या केंद्राच्या मदतीने आपण भविष्यातील आरोग्यसेवेवरील गरजेच्या गोष्टी साधू शकतो. एमक्युअरने औषध संशोधनात गुंतवणूक करुन स्थानिक कार्यक्षमतेच्या विकासाला वाव दिला आहे. यामुळे केवळ गुजरात राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नाव औषधनिर्मिती क्षेत्रात अग्रगण्य स्थानावर येईल. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मी एमक्युअर कंपनीच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. ’’
एमक्युअर संशोधन केंद्राने शाश्वत उपाय आणि हरित रसायनशास्त्र पद्धतींवर लक्ष केंद्रित करुन पर्यावरण संरक्षणासाठीही पुढाकार घेतला आहे. रोजगारनिर्मितीसाठीही हे केंद्र महत्त्वाचे मानले जाते. या केंद्रातून सामायिक ज्ञानाचा प्रसार व्हावा आणि सर्व घटकांचा विकास व्हावा म्हणून शैक्षणिक संस्था, उद्योग तज्ज्ञ आणि नियामक संस्थांसाठीही हे केंद्र खुले आहे.
एमक्युअर फार्माक्युटिकल्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सतीश मेहता यांनी या केंद्राबद्दल माहिती देताना सांगितले की, ‘‘संशोधन आणि विकास या दोन घटकांवर गेल्या चाळीस वर्षांमध्ये एमक्युअरने सर्वतोपरि बाजी मारली आहे. या काळात अशक्यप्राय वैद्यकीय आव्हांनावरील समस्यांचे निराकरण करता आले. या नव्या संशोधन विकास केंद्रातही अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कुशल टीमच्या मदतीने विविध समस्यांचे निराकरण करणारी उपाययोजना शोधली जाईल. या कामातील संशोधनाचा दर्जा आणि कर्मचा-यांच्या कार्यतत्परतेने भविष्यातील जागतिक पातळीवरील औषधांची गरज पूर्ण केली जाईल.’’
गुजरात येथील ईआरसी केंद्र सर्व नियमित आणि उदयोन्मुख आणि देशांतर्गत बाजारपेठेतील सर्व उत्पादनांची निर्मिती करुन औषधनिर्मितीचे मुख्य केंद्र म्हणून उदयास येत आहे.

