लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या कार्यशाळेतून लोककलेचा जागर संस्कृति कार्य संचलनायानच्या उपक्रमाला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद
पुणे–महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आयोजित आणि भारतीय लोककला अभ्यास संशोधन कल्याण केंद्र व सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व फोकलोर अँड क्लचरल हेरीटेज फाउंडेशन पुणे यांच्या समन्वयातून व्याख्यान, परिसंवाद, कार्यशाळा, शोधनिबंध वाचन, लोकसंस्कृती विषयक सांस्कृतिक कार्यशाळाचे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन संत नामदेव सभागृह, पुणे विद्यापीठ येथे केले होते. या दोन दिवशी कार्यशाळेमध्ये पहिल्या दिवशी लोकसंस्कृतीतील मौखिक परंपरा, परिसंवाद लोकसंस्कृतीची बलस्थाने आणि मर्यादा, परिसंवाद लोकसंस्कृतीतील स्त्री जीवन, शोधनिबंध वाचन, अंबाजोगाईची लळीत परंपरा, आदिवासी बोहाडा, पिंगळा, भारुड, गायन, लोकसंगीत मोठ्या उत्साहात पार पडले.तर दुसऱ्या दिवशी लोक दैवत संप्रदाय आणि भक्ती संप्रदाय, लोकरंगभूमीच्या भौतिक संस्कृतीमधील तथ्य आणि मिथक, लोक संस्कृतीतील रंजानात्म्क अविष्कार, कळसूत्री बाहुल्या, गोंधळ जागरण, लोकजीवनातून लुप्त झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण म्हणी, वाक्यप्रचार, उखाणे, कोंडी यांचे लोककथेच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले. कथक आणि लावणी जुगलबंदी सादर करून या लोकसाहित्य व लोकसंस्कृती कार्यशाळेची सांगता करण्यात आली.सदरील कार्यशाळेला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यामध्ये तरुणाई पासून वयोवृद्धांपर्यंत आवर्जून उपस्थिती लावली होती. सदरील महोत्सवाचे संयोजक सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे आणि लोकसाहित्य आणि फोकलोर अँड क्लचरल हेरीटेज फाउंडेशन समन्वयक डॉ.सुनीता धर्मराव होत्या.
महाराष्ट्रातील लोककला व कलाकारांना मिळणार नवसंजीवनी – चवरेमहाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या मार्फत अशाच कार्यशाळा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेतल्या जाणार असून अशा कार्यशाळांतून लुप्त होत चाललेल्या लोककला, लोकसंस्कृती व कलाकारांना नवसंजीवनी देण्यात येणार आहे. अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली.

