मुंबई: भारतातील लग्नसमारंभ केवळ विधीवत समारंभ नसतात तर जिथे संस्कृती, प्रेम आणि आनंद मोठ्या प्रमाणावर साजरे होतात असे उत्सव असतात. प्रत्येक कुटुंबासाठी तो आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा असतो. त्याचबरोबर आता लग्नसमारंभ हा सामाजिक प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. त्यातून थीम आणि डेस्टिनेशनवर आधारित लग्नांचे ट्रेंड सुरू झाले आहेत. अशी लग्नं अनेक दिवसांपासून ते आठवड्यांपर्यंत चालतात. परिणामी, या प्रसंगासाठी पुरेसा निधी निश्चित करणे हे फक्त काही महिन्यांचे नव्हे, तर अनेक वर्षांचे काटेकोर आर्थिक नियोजन आवश्यक बनले आहे.
लग्नाचे महत्त्व आणि त्याचा ग्राहकांवरील आर्थिक परिणाम लक्षात घेऊन भारतातील अग्रगण्य जीवन विमा कंपन्यांपैकी एक टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स (टाटा एआयए) ‘शुभ मुहूर्त’ नावाची नाविन्यपूर्ण जीवन विमा योजना सादर करत आहे. या योजनेत इक्विटीमध्ये गुंतवणूक यांसह भांडवली हमी, इच्छित लाभार्थ्याला निश्चित लाभ, जीवन संरक्षण, मृत्यू सारखा प्रसंग उद्भवल्यास तत्काळ निधी अशा अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. यामुळे पालकांना त्यांच्या मुलाच्या स्वप्नातील लग्नासाठी बचत करण्यात मदत होईल आणि हा क्षण आयुष्यभरासाठी संस्मरणीय बनेल हे सुनिश्चित करता येऊ शकेल.
ही योजना सुरू करण्याबद्दल बोलताना टाटा एआयएचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी अय्यर म्हणाले: “टाटा एआयए लाइफमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांच्या जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांनुसार त्यांच्या अनोख्या गरजा समजून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो. पालकांसाठी लग्नाचे महत्त्व काय असते हे आम्हाला समजते. लग्न हा केवळ प्रेम आणि एकत्र येण्याचा उत्सव नसून कुटुंबीयांच्या भावना आणि आकांक्षांचे प्रतीक आहे. ‘शुभ मुहूर्त’ कुटुंबांना पूर्वनियोजन करण्यासाठी मदत करेल.”
“जोडीला आम्हाला अशी उपाय सुविधा द्यायची होती की जर दुर्देवाने पालकांचा मृत्यू ओढवला तरी उद्दिष्ट सुरक्षित राहील. ‘शुभ मुहूर्त’द्वारे आम्ही कुटुंबांना आनंदाच्या या क्षणांचे आत्मविश्वासाने नियोजन करण्यात मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहोत आणि त्यांच्या जीवनातील या महत्त्वाच्या टप्प्याला साजरे करण्यासाठी त्यांना ‘तयार’ करू इच्छितो.”
ही योजना ज्यांच्या मुलांचे वय 1 ते 20 वर्षे आहे अशा 31 ते 50 वर्षे वयोगटातील पालकांसाठी सर्वोत्तम आहे. या योजनेत लवकर गुंतवणूक केल्यास पालकांना त्यांच्या मुलाच्या भव्य लग्नासाठी हवे असलेले भांडवल जमविण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
शुभ मुहूर्त ची खास वैशिष्ट्ये
लग्नाचे नियोजन हा आनंददायी आणि तणावमुक्त अनुभव होईल अशा प्रकारे शुभ मुहूर्त योजना डिझाइन करण्यात आली आहे. यातील अनोखे लाभ पुढीलप्रमाणे:
· लग्नाशी संबंधित विविध खर्चांचे नियोजन: लग्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खर्च समाविष्ट असतात. त्यात लग्नासाठीचे ठिकाण आरक्षित करणे, समारंभ आयोजित करणे, अन्न-पदार्थ आणि पेये यावर होणारा खर्च, दागिने आणि लग्नाचे पोशाख खरेदी करणे, पाहुण्यांसाठी निवासाची सोय करणे इत्यादी. शुभ मुहूर्ताचे नियोजित पेआऊट आवश्यक वेळेस निधी उपलब्ध करून देतात. त्यामुळे पालकांना अंतिम क्षणी पैसा जमवण्याची चिंता करण्याऐवजी सोहळा साजरा करण्यावर लक्ष केंद्रित करता येते.
· इक्विटी एक्स्पोजरसोबत भांडवली हमी: भरलेल्या प्रीमियमचे संरक्षण केल्यामुळे पालकांना आर्थिक सुरक्षा आणि मनःशांती मिळते. भलेही बाजारात चढ-उतार होत असले, तरीही हमी रक्कम हे सुनिश्चित करते की लग्नाचे नियोजन बाजारातील अनिश्चिततेमुळे बिघडणार नाही.
· दीर्घकालीन संपत्ती वृद्धी: लग्नसमारंभाशी मोठ्या आकांक्षा जोडलेल्या असतात. शुभ मुहूर्त बाजाराशी जोडलेल्या गुंतवणुकीच्या माध्यमातून कालांतराने मोठे भांडवल तयार करण्यात मदत करते. यामुळे इतर जीवन उद्दिष्टाशी तडजोड न करता डेस्टिनेशन लग्न किंवा उच्चस्तरीय व्यवस्था यांसारख्या भव्य शाही लग्नांसाठी आवश्यक आर्थिक स्त्रोत उपलब्ध होतात.
· MWPA अंतर्गत विशेष संरक्षण: मॅरिड वुमन प्रॉपर्टी अॅक्ट (MWPA) अंतर्गत पॉलिसी उत्पन्नाचे संरक्षण केल्यामुळे मुलाच्या लग्नासाठी राखलेला निधी कायदेशीररित्या संरक्षित राहतो आणि कोणत्याही बाह्य आर्थिक दाव्यांपासून सुरक्षित राहून नॉमिनीला उपलब्ध होतो.
लाभ संरक्षण रायडर: हा रायडर अतुलनीय सुरक्षा प्रदान करतो:
· तात्काळ मृत्यू लाभ: विमाधारकाच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटनेत, कुटुंबाला आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यामुळे त्यांचे जीवनाचे उद्दिष्ट निर्विघ्नपणे पुढे जाऊ शकते.
· प्रीमियम सूट: भविष्यातील प्रीमियम माफ करून पॉलिसीची सातत्यपूर्णता राखली जाते आणि कुटुंबावर आर्थिक ताण येत नाही.
· नॉमिनींसाठी मॅच्युरिटी लाभ: विमाधारकाच्या अनुपस्थितितसुद्धा मुलाच्या लग्नाचे उद्दिष्ट पूर्ण होईल हे सुनिश्चित करत ठरलेला मॅच्युरिटी लाभ देण्यात येतो.
शुभ मुहूर्त हा टाटा एआयए च्या शुभ सोल्यूशन्स मालिकेचा एक भाग आहे. मुलांच्या शिक्षणापासून त्यांचे लग्नाचे स्वप्न पूर्ण करणे यासाठी निधी उपलब्ध व्हावा याकरता सुरुवातीच्या वर्षात संपत्ती निर्मितीपासून सुवर्णवर्षांत आपल्या आकांक्षा पूर्ण करणे, परंपरा जोपासणे यासाठी जीवनातील प्रत्येक टप्प्यासाठी योग्य प्रकारचे विमा उत्पादन पुरवतो. टाटा एआयए च्या ‘हर वक्त के लिए तैयार’ या ब्रँड वचनाशी हा उपक्रम सुंदरपणे सुसंगत आहे.
प्रत्येक कुटुंबाच्या आकांक्षा वेगवेगळ्या असतात आणि काही विशिष्ट वेळेस मुलाच्या लग्नाऐवजी इतर उद्दिष्टांसाठी असू शकतात. हे लक्षात घेऊन, टाटा एआयएने या मालिकेतील दुसरी योजना ‘शुभ फॉर्च्यून’* सादर केली आहे.
शुभ फॉर्च्यून ही एक व्यापक आर्थिक योजना आहे जी जीवनातील विविध महत्त्वपूर्ण टप्प्यांना सामोरे जाण्यासाठी तयार करण्यात आली आहे. सुरुवातीच्या करिअरमध्ये संपत्ती निर्माण करणे, मुलाच्या शिक्षणासाठी नियोजन करणे किंवा घर खरेदी करण्यासारख्या आकांक्षा पूर्ण करणे यासारखे जीवनातील महत्वपूर्ण टप्पे विनाअडथळा पार करण्यासाठी मदत करण्याकरता शुभ फॉर्च्यून डिझाईन करण्यात आली आहे.
कोणतीही तडजोड न करता भारतीय कुटुंबांना सोहळा साजरा करण्यासाठी सक्षम करणे
या नाविन्यपूर्ण योजना सादर करून, टाटा एआयए लाइफ भारतीय कुटुंबांना त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांचे नियोजन आणि ते साजरे करण्यास मदत करण्यासाठी आपले योगदान दृढ करते. संस्कृतीशी जोडलेले मूल्य आणि आर्थिक स्थैर्य यांचा संगम साधणाऱ्या योजना तयार करण्याच्या टाटा एआयएच्या ध्येयाचे हे प्रतीक आहे. त्यामुळे कुटुंबे कोणत्याही आर्थिक ताणाविना जीवनातील खास क्षण साजरे करू शकतात.
* ही योजना टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स फॉर्च्यून गॅरंटी सिक्युअर (UIN:110N206V02) ची एक वैयक्तिक, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, जीवन विमा बचत योजना आणि टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स स्मार्ट फॉर्च्यून प्लस (UIN:110L177V01) एक युनिट-लिंक्ड, वैयक्तिक जीवन विमा बचत योजना यांचे संयोजन आहे.