पुणे, दि. २१ जानेवारी : लहानपणापासून खो खो खेळाचे धडे शिकलेला आणि मुळ पुणे आणि सध्या ऑस्ट्रेलियात राहणारे मंगेश व तेजस जगताप यांनी इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमध्ये सुरू असलेल्या खो खो विश्वचषक २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करीत आहेत. या संघाने गुणांची चौकार मारत मलेशिया व जर्मनीचा पाडाव केला. ऑस्ट्रेलियन संघाने कमाल कामगिरी केली. त्यामुळे हा संघ भविष्यात यशस्वी संघ म्हणून उदयास येत आहे.
आयोजित विश्वकप खो खो स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाचे एकूण चार सामने झाले. यामध्ये इंग्लंड केनिया यांच्या बरोबर झालेल्या मॅचमध्ये ते हरले. परंतू मलेशिया व जर्मनी बरोबर झालेले सामने जिंकले. यामध्ये जगताप बंधुंनी आपली चपळता दाखवली आहे. यामध्ये मंगेश जगताप याच्या अप्रतिम खेळाबद्दल चार ही मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच चा सन्मान मिळाला आहे. या दोघांची मेहनत आणि गुणवत्ता पाहून ऑस्ट्रेलिया खो खो असोसिएशनने त्यांची निवड केली होती. धमाकेदार खेळ करीत गुण मिळविले.
पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ कामगिरी बजावण्यास दक्ष झाला असताना त्याला पुण्याची साथ लाभली आहे. यामध्ये विशेष म्हणजे मंगेश व तेजस या जगताप बंधुचा कांगारू संघात समावेश आहे. नवी दिल्ली येथे पहिल्या खो खो विश्व चषक स्पर्धेला नुकतीच सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ अनेक कारणांनी लक्ष वेधून घेत आहे. एकतर या संघाचे नेतृत्व आणि संघटन महाराष्ट्रातील इचलकरंजीच्या ओजस कुलकर्णी याच्याकडे आहे.
जगताप बंंधुचे खेळातील योगदान खूप लक्षवेधी ठरले आहे. ऑस्ट्रेलिया संघांचे आणखी एका कारणाने आकर्षण वाढले आहे. ते म्हणजे जगताप कुटुंबीयाचे योगदान. तेजस २४ वर्षाचा तरूण तर त्याचा १८ वर्षीय भाऊ मंगेश . दोघेही ऑस्ट्रेलियात खो खो मध्ये भरीव कामगिरी करीत आहेत. त्यांचे वडील संदीप जगताप हे ऑस्ट्रेलिया संघाचे प्रायोजक आहेत. ते फिन्सवर्स कंपनीचे चालक आहेत. पदवी मिळवल्यानंतर तेजस हा या कंपनीत संचालक आहे. अशी पुणेरी पलटण विश्वचषक खो खो स्पर्धेत लक्ष्यवेधी कामगिरी केली आहे.