सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद
मुंबई:अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी (Saif Ali Khan Attack Case) मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देतील.
वृत्तसंस्था एएनआयने याबद्दल माहिती दिली आहे.मुंबई पोलिसांचा हवाला देत एएनआयने वृत्त दिले आहे की, अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील कासारवडवली येथील हिरानंदानी इस्टेटच्या मागील परिसरातून मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केली.
आरोपीचे नाव मोहम्मद अलियान उर्फ BJ आहे. या हल्ल्यानंतर पकडले जाण्याच्या भीतीने आरोपीने आपले खरे नाव उघड केले नाही. त्याने सुरुवातीला पोलिसांना स्वत:चे बनावट नाव विजय दास असल्याचे सांगितले. तसेच, आरोपी ठाण्यातील Ricky’s बारमध्ये हाऊसकीपिंग वर्कर म्हणून काम करत होता.
दरम्यान, गुरुवारी पहाटे अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये हल्ला झाला होता. यावेळी हल्लेखोराने त्याच्यावर चाकूने अनेक वार केले. गंभीर दुखापत झाल्यानंतर, सैफ अली खानला तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सैफ अली खानवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.