अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहे. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहेत. तर, अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्यासोबतच पुण्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे. तर धनंजय मुंडे यांचं नाव पालकमंकत्र्यांच्या यादीतून वगळण्यात आलेलं आहे.मस्साजोग सरपंच हत्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने मंत्री धनंजय मुंडे यांना पालकमंत्र्यांच्या यादीतून वगळल्याचे दिसून येत आहे. तर मुंडे यांच्याकडे बीडचे पालकमंत्रीपद देऊ नये, अशी मागणी जनतेकडून केली जात होती. त्यामुळेच बीडचे पालकमंत्रीपद हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे.
राज्यातील सर्व पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी पुढीलप्रमाणे आहे
- देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) – गडचिरोली
- एकनाथ शिंदे – (उपमुख्यमंत्री) – ठाणे, मुंबई शहर
- अजित पवार – (उपमुख्यमंत्री) – पुणे, बीड
- चंद्रशेखर बावनकुळे – नागपूर, अमरावती
- राधाकृष्ण विखे पाटील – अहिल्यानगर
- हसन मुश्रिफ – वाशिम
- चंद्रकांत पाटील – सांगली
- गिरीश महाजन – नाशिक
- गणेश नाईक – पालघर
- गुलाबराव पाटील – जळगाव
- संजय राठोड – यवतमाळ
- आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा (सहपालकमंत्री) – मुंबई उपनगर
- उदय सामंत – रत्नागिरी
- जयकुमार रावल – धुळे
- पंकजा मुंडे – जालना
- अतुल सावे – नांदेड
- अशोक उईके – चंद्रपूर
- शंभुराज देसाई – सातारा
- अदिती तटकरे – रायगड
- शिवेंद्रराजे भोसले – लातूर
- माणिकराव कोकाटे – नंदूरबार
- जयकुमार गोरे – सोलापूर
- नरहरी झिरवळ – हिंगोली
- संजय सावकारे – भंडारा
- संजय शिरसाट – छत्रपती संभाजीनगर
- प्रताप सरनाईक – धाराशिव
- मकरंद जाधव – बुलढाणा
- नितेश राणे – सिंधुदुर्ग
- आकाश फुंडकर – अकोला
- बाबासाहेब पाटील – गोंदिया
- प्रकाश आबिटकर आणि माधुरी मिसाळ (सहपालकमंत्री) – कोल्हापूर
- आशिष जयस्वाल (सहपालकमंत्री) – गडचिरोली
- पंकज भोयर – वर्धा
- मेघना बोर्डीकर – परभणी