एअर इंडिया महा कुंभ २०२५ साठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रयागराजसाठी दररोज विमानसेवा देणार
- २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दिल्ली–प्रयागराज विमानसेवा
- दिल्ली, भारतातील इतर शहरे आणि जगातील इतर भागांमधून प्रयागराजसाठी सुविधाजनक विमानसेवा
गुरुग्राम १४ जानेवारी २०२५: एअर इंडियाने आज घोषणा केली आहे की, जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक मिळावा महा कुंभ मेळा २०२५ साठी दिल्ली आणि प्रयागराज दरम्यान दररोज विमानसेवा चालवली जाणार आहे. ही दैनंदिन विमानसेवा महा कुंभ मेळा २०२५ साठी तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे.
महा कुंभ मेळा २०२५ साठी प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे, ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली मागणी सक्षमपणे पूर्ण करता यावी यासाठी एअर इंडिया २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत प्रयागराजसाठी विशेष विमानसेवा चालवणार आहे. त्यामुळे आता एअर इंडिया ही दिल्ली ते प्रयागराज सर्व सेवांसहित विमान प्रवास सुविधा देणारी एकमेव कंपनी बनली आहे, एअर इंडियाने आपल्या प्रवाशांना इकॉनॉमी क्लासबरोबरीने प्रीमियम केबिनचा देखील पर्याय उपलब्ध करवून दिला आहे.
दोन्ही बाजूंनी दिवसाच्या सुविधाजनक वेळी सुटणार असलेल्या या विमानसेवांमुळे भारतातील विविध शहरे तसेच उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण–पूर्व आशियातील विविध देशांमधून तसेच या देशांमध्ये प्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी ही खूप मोठी सोय आहे.
दिल्ली आणि प्रयागराज दरम्यान विमानसेवेचे वेळापत्रक | |||||
कालावधी | विमान# | फ्रिक्वेन्सी | क्षेत्र | प्रस्थान | आगमन |
२५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ | एआय२८४३ | दररोज | दिल्ली-प्रयागराज | १४:१० | १५:२० |
एआय२८४४ | दररोज | प्रयागराज-दिल्ली | १६:०० | १७:१० | |
१ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ | एआय८४३ | दररोज | दिल्ली-प्रयागराज | १३:०० | १४:१० |
एआय८४४ | दररोज | प्रयागराज-दिल्ली | १४:५० | १६:०० |
या विमानसेवांची बुकिंग्स सर्व चॅनेल्सवर खुली करवून देण्यात येत आहेत,