श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजन : २०० हून अधिक वादकांचा सहभाग
पुणे: श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनानिमित्त दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरी मध्ये १०० दुचाकी आणि शोभा रथ यांचा सहभाग होता. दुचाकी रॅलीमध्ये २०० हून अधिक नागरिकांचा सहभाग होता.
फेरीचे आयोजन प्रमुख म्हणून अभिजीत गरवारे, प्रणीत गराटे, वैभव महाशब्दे, पंकज वर्तक यांनी काम पाहिले. रॅलीचा समारोप शिव व्याख्याते आणि लेखक सौरभ कर्डे यांच्या व्याख्यानाने झाली. यावेळी रा. स्व. संघाचे पर्वती भाग कार्यवाह दर्शन मिरासदार, सहकार्यवाह महेश डाबी आणि बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड, ट्रस्टचे अध्यक्ष विलास शिगवण आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सारसबाग बागेमागील मैदान, अभिनव चित्रशाळा चौक, एस पी कॉलेज चौकातून डावीकडे निलायम पूल, राजीव गांधी ई लर्निंग स्कूल चौकात उजवीकडे, मुक्तांगण शाळा, वाळवेकर नगर सातारा रस्ता चौक उजवीकडे, स्वामी विवेकानंद पुतळा पद्मावती येथे रॅलीचा समारोप झाला. सूत्रसंचालन मयंक पुरंदरे यांनी केले. देवेंद्र आठवले यांनी आभार मानले.