योनेक्स सनराईज पीवायसी एचटीबीए अमनोरा कप १५ वी जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धा
हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजन
पुणे: जतिन सराफ, खूश दीक्षित यांनी पीवायसी एचटीबीसी-अमनोरा कप जिल्हा सुपर-५०० मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत १३ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील १३ वर्षांखालील मुलांच्या उपांत्य फेरीत अग्रमानांकित जतिन सराफने सातव्या मानांकित प्रथमेश जगदाळेवर २१-८, २१-१२ असा विजय मिळवला. त्याची लढत दुस-या मानांकित खूश दीक्षित विरुद्ध होईल. खूशने दुस-या उपांत्य लढतीत सिद्धार्थ सामंतवर २१-७, २१-९ असा विजय मिळवला.
माधव-चिन्मय यांच्यात फायनल
स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलांची अंतिम लढत माधव कामत आणि चिन्मय फणसे यांच्यात होईल. उपांत्य फेरीत माधव कामतने विहान कोल्हाडेला २१-१७, २१-१६ असे नमविले. यानंतर दुस-या मानांकित चिन्मय फणसेने अनय एकबोटेवर २१-१४, २१-१२ असा विजय मिळवला.
शरयू, सोयराची आगेकूच
स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलींच्या उपांत्य फेरीत अग्रमानांकित शरयू रांजणेने सान्वी पाटीलला २१-७, २१-१३ असे, तर सोयरा शेलारने ख्याती कत्रेला २१-१२, १८-२१, २१-१४ असे नमविले. युतिका-सफा आमनेसामनेस्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलींच्या उपांत्य फेरीत अग्रमानांकित युतिका चव्हाणने मनीषा विष्णूकुमारला २१-१७, २१-१८ असे नमविले. दुस-या उपांत्य फेरीत सफा शेखने जिया उत्तेकरचे आव्हान २२-२०, २०-२२, २१-३ असे परतून लावले.
मुलांच्या गटात सुदीप खोराटेने अंतिम फेरीत प्रवेश केला. सुदीपने श्लोक डागाला २४-२२, १५-२१, २१-१६ असे नमविले. आता त्याची अंतिम लढत चौथ्या मानांकित ओजस जोशीविरुद्ध होईल. ओजसने देवांश सकपाळवर २१-११, २१-१२ असा विजय मिळवला.
निकाल – १७ वर्षांखालील मुले – उपांत्यपूर्व फेरी – अर्हम रेदासानी वि. वि. अभिज्ञ सिंघा २२-२०, २१-१५, ओजस जोशी वि. वि. विहान कोल्हाडे २१-६, २१-९, विहान मूर्ती वि. वि. शार्दूल अवारी २१-१६, २१-१६, कपिल जगदाळे वि. वि. नितीन एस. ७-२१, २१-१८, २१-१७.
१७ वर्षांखालील मुली – उपांत्यपूर्व फेरी – शरयू रांजणे वि. वि. नाव्या रांका २१-१०, २१-१३, ख्याती कत्रे वि. वि. एस. डाखणे २६-२४, २१-१२, सोयरा शेलार वि. वि. सान्वी पाटील २१-१२, २१-११, मनीषा विष्णूकुमार वि. वि. भक्ती पाटील २१-१७, २१-११.
३५ वर्षांवरील पुरुष एकेरी – उप-उपांत्यपूर्व फेरी – चैतन्य डोणे वि. वि. साईकिरण एल्ला २१-१५, २१-११, पंकज अरोरा वि. वि. विपूल अन्वेकर २१-१५, २१-१५, नवीनकुमार वि. वि. जावेद शेख २१-७, २१-८, दर्शन सेलोत वि. वि. जतिन ठक्कर २१-१२, २१-१७, सौरभ राय वि. वि. शौनक गाडगीळ २१-१८, २१-१८, हर्षद भागवत वि. वि. सुनील जयस्वाल २१-६, २१-८.