मुंबई-कॅसिनोमध्ये काय कुणी सँडविच खायला जात नाही. मकाऊ, बँकॉक हे काही थंड हवेचं ठिकाण नाही. अशा ठिकाणी जाऊन बसणं हा काही गुन्हा नाही. मी कुठे म्हटलं गुन्हा आहे? पण जाऊन तुम्ही खोटं बोलत आहात. मकाऊला मी पण जाऊन आलो आहे. एक गाव कसं उभं राहतं आहे ते मी पाहिलं आहे. आपण जबाबदार लोक आहोत. इथे येऊन आम्हाला ज्ञान दिलं जातं आहे. भाजपाला हे अंगावर ओढून घेण्याची गरज नव्हती. प्रत्यक्षदर्शी असं सांगतो त्या रात्री फोटोतल्या व्यक्तीने साडेतीन कोटींचे पोकर्स विकत घेतलं. पोकर्स ही तिथली करन्सी आहे. त्यांच्यापुढे पोकर्स आहेत. मला ते माहीत नव्हतं. माझ्याकडे २७ फोटो आणि व्हिडीओ आहे. आणखी एक महाशय होते त्यांनीही दोन कोटींचे पोकर्स विकत घेतले आहेत. आता भाजपाच्या लोकांना अच्छे दिन आले असतीलअसे म्हणत खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.
जे छायाचित्र प्रसिद्ध झाले त्यात बावनकुळे यांचे कुटुंबीय आहे का? जे दिडदमडीचे लोक आमच्यावर टोळधाड सोडत आहेत. तर त्यांनी स्पष्टपणे सांगायला हवे होते कि हो तो मीच आहे. कॅसिनोमध्ये जाणे गुन्हा नाही. खोटे बोलणे गुन्हा आहे.
चीनच्या अखत्यारीतील मकाऊ शहर जुगारासाठी प्रख्यात आहे. तेथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जुगार खेळत असल्याचा व्हिडिओ फोटोसह उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी व्हायरल केला. मकाऊतील व्हेनिस हॉटेलच्या कॅसिनोमध्ये जुगार खेळून बावनकुळे यांनी 3 कोटी 50 लाखांची उधळपट्टी केली, असा आरोपही त्यांनी केलाय.
संजय राऊत म्हणाले, कॅसिनोमध्ये जाणे गुन्हा नाही. खोटे बोलणे गुन्हा आहे. तो मी नव्हेच, असे म्हणणे गुन्हा आहे. भाजपला हे अंगावर ओढून घ्यायची गरज नव्हती, असेही संजय राऊत म्हणाले.
अजून व्हिडीओ आहेत..
संजय राऊत म्हणाले, मकाऊमध्ये पिझ्झा, सँडविच खायला कोणी जात नाही. त्याठिकाणी निसर्गरम्य वातावरणही नाही. माणसाने सर्व काही शिकल्या पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे, निरीक्षण केले पाहिजे. अशाठिकाणी जाणे गुन्हा नाही. खोटे बोलणे गुन्हा आहे. तो मी नव्हेच. मी तिथे पिझ्झा खायला गेलो होतो. माझ्याकडे अजून व्हिडीओ आहेत. मकाऊला मी सुद्धा गेलेलो आहे.
साडेतीन कोटींचे पोकर्स
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील जबाबदार व्यक्ती चीनच्या अख्यारितीत जाऊन जुगार खेळत आहेत. आणि उलट पुन्हा महाराष्ट्रात आम्हाला ज्ञान देणार. भाजपला हे अंगावर ओढून घ्यायची गरज नव्हती. प्रत्यक्षदर्शी असे सांगतात कि, फोटोतल्या व्यक्तीने साडेतीन कोटींचे पोकर्स विकत घेतले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर पिझ्झा, सँडविच नाहीये. पोकर्स आहेत. गॅम्बलिंगमध्ये जी करन्सी लागते त्याला पोकर्स म्हणतात. त्या महाशयांसोबत आणखी लोक होते. त्यांनी 2 करोडचे पोकर्स खरेदी केले.
तुमचे मन तुम्हाला का खात आहे?
संजय राऊत म्हणाले, जे छायाचित्र प्रसिद्ध झाले त्यात त्यांचे कुटुंबीय आहे का, जे दिडदमडीचे आमच्यावर बोलत आहेत त्याची काही गरज आहे का. एवढे तुमचे मन तुम्हाला का खात आहे. एवढी मोठी टोळधाड सोडण्यापेक्षा सांगायला हवे होते की, होय मी त्याठिकाणी गेलो. खोट का बोलताय. तसेच आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर बोलताना राऊत म्हणाले, तो ग्लास आहे कि डायट कोकचा कॅन आहे हे स्पष्ट दिसत आहे. मोदी जे पितात तेच आदित्य ठाकरे पितात

