योनेक्स सनराईज पीवायसी एचटीबीए अमनोरा कप १५ वी जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धाहवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजन
पुणे : युतिका चव्हाण, सफा शेख यांनी पीवायसी एचटीबीसी-अमनोरा कप जिल्हा सुपर-५०० मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित युतिका चव्हाणने एकिशा मेदानेवर २१-१२, २१-१२ असा विजय मिळवला. आता उपांत्य फेरीत तिची लढत मनिषा तिरुकोंडा आणि सान्वी पाटील यांच्यातील विजेतीशी होईल. चौथ्या मानांकित सफा शेखने सई अगवणेवर २१-१८, २१-१९ अशी मात केली.
यश, प्रद्युम्न चौथ्या फेरीतपुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत अग्रमानांकित चैतन्य खरातने अनिश भुजबळला २१-८, २१-३ असे, विवेक चंद्रवंशीने सुजल खुडेवर २१-३, २१-१० अशी, कोणार्क इंचेकरने सुमित भोळेवर २१-१३, २१-१५ अशी मात केली. सुदीप खोराटेने राहुल पाटीलचे आव्हान १५-२१, २१-४, २१-१० असे, मोक्षित पोरवालने अभिजित कदमचे आव्हान २१-१८, २१-१७ असे परतवून लावले. प्रद्युम्न खंदाडेने राजू ओव्हलवर २२-२०, २१-१३ असा, यश तावरेने घनश्याम पाटीलवर २१-१४, २१-८ असा विजय मिळवला.
निकाल : १७ वर्षांखालील मुली – तिसरी फेरी – शरयू रांजणे वि. वि. वेनिषा कोल्हे २१-९, २१-५, नाव्या रांका वि. वि. देवश्री जिनराळकर २१-१२, २१-५, एस. डाखणे वि. वि. अनन्या बोंद्रे २१-१६, २१-१६, सान्वी पाटील वि. वि. पर्णवी मोहळकर २३-२१, २१-१३, सोयरा शेलार वि. वि. शार्दूली माळी २१-११, २१-६.
१७ वर्षांखालील मुले – तिसरी फेरी – देवांश सकपाळ वि. वि. सौरिष काने २१-१८, २१-१८, श्रेयस मासळेकर वि. वि. आरव राय २१-१५, २१-८, अर्हम रेदासनी वि. वि. अर्णव मिरजकर २१-१३, २१-६, ओजस जोशी वि. वि. विस्मय म्हस्के २१-१०, २१-६, नील शोरन वि. वि. वरुण हवालदार २१-११, २१-३, अजिंत्य जोशी वि. वि. नचिकेत गोखले २१-१३, २१-८, विहान कोल्हाडे वि. वि. आरुष अरोरा २१-१६, १०-२१, २१-१६, कृष्णनील गोरे वि. वि. वेदान्त जोशी २१-१७, २१-१२, शार्दूल अवारी वि. वि. जयंत झाडे २१-१६, ११-२१, २१-१६, चिन्मय फणसे वि. वि. नंदन हुगर २१-२, २१-७, विहान मूर्ती वि. वि. कार्तिक दिनेश २१-७, २१-४, ईशान लागू वि. वि. माधव कामत १९-२१, २१-१६, २१-१४, नितीन एस. वि. विय स्वरित सातपुते २१-६, २१-१२.
महिला एकेरी – दुसरी फेरी – अस्मिता शेडगे वि. वि. कल्याणी वाकरेकर २१-३, २१-६, युतिका चव्हाण वि. वि. जिया उत्तेकर २१-१९, २१-११, मनाली देशपांडे वि. वि. गायत्री केंजळे २१-१३, २१-१९, मधुरा काकडे वि. वि. रिया तांबडे २१-८, २१-१, श्रेया शेलार वि. वि. यशस्वी काळे २१-१९, २१-१२, पायल बी. पाटील वि. वि. सुहासिनी यादव २१-१०, २१-४, एकिशा मेदाने वि. वि. प्रिया शेळके २१-१४, २१-१३, आयुषी मुंडे वि. वि. श्रुती कुलकर्णी २१-३, २१-६.
पुरुष एकेरी – तिसरी फेरी – वसीम शेख वि. वि. वेदांत शिंदे १५-२१, २१-४, २१-१०, कृष्णा जसूजा वि. वि. करण परदेशी २१-५, २१-१४, आदित्य ओक वि. वि. सिद्धार्थ भोसले २१-९, २१-१९, दिग्विजयसिंग राजपूत वि. वि. हिमांशू हरदेव २१-६, २१-८, अथर्व खिस्ती वि. वि. ऋग्वेद भोसले २१-१८, २१-१५, निक्षेप कात्रे वि. वि. आद्य पारसनीस २१-१६, २१-१५, सुजल लखारी वि. वि. प्रथमेश बेलदरे २१-१०, २१-१९.
युतिका, सफा उपांत्य फेरीत दाखल
About the author
SHARAD LONKAR
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/