पुणे– नायलॉन मांजामुळे वारंवार गंभीर घटना होत असल्याने त्याअनुषंगाने पोलीस आयुक्त, अमितेशकुमार यांनी पतंगाचा प्रतिबंधीत नायलॉन मांजा विकणारे दुकानदार, पुरवठादार व वापर करणारे यांच्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने गुन्हे शाखे कडून जोरदार कारवाई सुरु करण्यात आली आहे.
युनिट ४ कडील पथक येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कृत्रिम वेगवेगळ्या रंगाचा लेप लावलेला नायलॉन मांजा विक्री करणारे दुकानदार चेक करीत असताना पोलीस अंमलदार विशाल गाडे व हरीष मोरे यांना बातमी मिळाली की शेलार चाळ, मच्छी मार्केट, येरवडा पुणे येथील सार्वजनिक बोळी मध्ये एक महिला कृत्रिम लेप लावलेला नायलॉन मांजा विक्री करीत आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री केली असता नायलॉन मांजा विक्री करणारी एक महिला वय ३७ वर्षे रा.शेलार चाळ गाडीतळ येरवडा पुणे ही मिळून आल्याने तिच्या ताब्यात ३.२००, रु कि वेगवेगळ्या रंगाच्या बंदी असलेला नायलॉन मांजाची चार चकरी मिळून आल्याने तिच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर २४/२०२५ बीएनएस कलम २२३ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६चे कलम ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नायलॉन मांजाची विक्री करणारा विधीसंघर्षित बालक ताब्यात
वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे शाखा युनिट १ कडील पो. उप निरी. तापकीर, व स.पो. फौ. मखरे, पोलीस अंमलदार दरेकर, साळुंखे, जाधव, कोळगे, साबळे पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंगलदार निलेश साबळे यांना मिळाल्या बातमी च्या अधारे सर्वे नं ७ तळजाई पठार पुणे येथून एका आपचारिक बालकास कि रु ४,५००/- चा नायलॉन मांजा विक्री करिता जवळ बाळगला असताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध भा न्या सं कलम २२३ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ०५ प्रमाणे फिर्याद दिली असून आपचारिक बालकास सहकारनगर पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरोडा वाहन चोरी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर
नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांना घेतले ताब्यात
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १ कडील अंमलदार पश्चिम प्रादेशिक विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार श्रीकांत दगडे व दत्तात्रय पवार यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मित्र मंडळ चौकाकडून पर्वतीकडे जाणाऱ्या कॅनॉल रोडचे अंतर्गत रोडवरील ठिकाणी दोन इसम नायलॉन मांजाची विक्री करिता येणार असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे पत्ते १) शशांक चंद्रप्पा धनगर, वय १९ वर्ष, रा गणेश मळा, सिंहगड रोड पुणे २) रोहित राम शिंदे वय ३४ वर्ष रा पर्वती दर्शन, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांच्या ताब्यात विक्री करण्यासाठी आणलेल्या ४,८००/ रु किं च्या चायनीज नायलॉन मांजाच्या एकुण ६ चकरी मिळाल्या वरील नमुद दोन्ही इसमांवर पर्वती पोलीस स्टेशन येथे भान्या से कलम २२३ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ०५ प्रमाणे\गुन्हा दाखल करण्यात आला नमुद दोन्ही इसमांना पुढील योग्य त्या कारवाईकरिता पर्वती पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे
वरील कारवाई अपर पोलील आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे व पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेल्या आहेत.
नायलॉन मांज्याची विक्री करणा-या इसमावर छापा टाकुन ११ नायलॉन रिळ केले जप्त.
दि.११/०१/२०२५ रोजी तपास पथकातील पोलीस स्टाफ सिंहगड रोड पोलीस स्टेशन हाद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिग करीत असताना मानाजीनगर न-हे पुणे येथे आलो असता, पोलीस अंमलदार अमोल पाटील यांना त्याचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सिध्दी क्लासिक बिल्डींगचे शेजारी व अमोल दांगट याचे चाळी समोर मोकळ्या जागेत वडगाव बुगा पुणे. येथे एक इसम चोरुन शासनाने प्रतिबंधीत केलेल्या नायलॉन मांज्याची त्यांच्या ओळखीच्या लोकांना विक्री करत आहे. अशी बातमी मिळाली.
सदरची बातमी सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना कळविली असता, त्यांनी सदरची बातमी वरिष्ठांना कळविल्याने वरिष्ठांनी बातमीची खात्री करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाता सदर ठिकाणी एक इसम उपस्थित होता. त्यास आमची व आमचे सोबतचे पोलीस स्टाफची पंचाची ओळख सांगुन सदर इसमास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव योगेश शत्रुध्न शहा वय २० वर्षे रा, नेवसे हॉस्पीटल जवळ, वडगाव बु पुणे, त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याचे जवळ एका खाकी रंगाचे बॉक्स मध्ये ६,५००/-रु. किं. चे ११ नायलॉन मांज्याचे रिळ आढळुन आले ते जप्त करुन त्यांचे विरुध्द सिंहगड रोड पो स्टेशन गुन्हा रजि नं २४/२०२५ भा. न्या. संहिता २०२३ चे कलम २२३, १२५, तसेच पर्यावरण संरक्षण कायदा कलम १९८६ चे कलम ५,१५ अन्वये दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस पोलीस अंमलदार संजय शिदे हे करीत आहेत.