धनकवडीत दुर्लक्ष होत असल्याचे सूत्रांची माहिती
पुणे- अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणा-या आरोपीवर छापा टाकुन ६१ गॅस टाक्या व गॅस टाक्या वाहुन नेणारा टेम्पो सिंहगड रोड पोलीसांनी जप्त केला आहे.दरम्यान अशाच प्रकारचा काला बाजार धनकवडी सहकारनगर पोलिसांच्या हद्दीत होत असल्याची सूत्रांची माहिती असून येथे दुलाक्ष होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान पोलिसांनी सांगितले कि,’ काल दि.११/०१/२०२५ रोजी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे तपास पथक कार्यालयात हजर असताना पोलीस अंमलदार सागर शेडगे व अमोल पाटील यांना त्याचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दत्तमंदिर निवृत्तीनगर कडे जाणारे रोडचे बाजुला असलेल्या मोकळ्या मैदानात वडगाव बु पुणे येथे एक इसम हा अनाधिकृतपणे स्वतःच्या फायद्या करीता सिलबंद घरगुती गॅस सिलेंडरचा साठा करुन त्याची चोरुन अवैधरित्या विक्री करीत आहे. अशी बातमी मिळाली.
सदरची बातमी सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना कळविली असता, त्यांनी सदरची बातमी वरिष्ठांना कळविल्याने वरिष्ठांनी बातमीची खात्री करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने अवैधरित्या विक्री करीत असलेल्या गॅस संदर्भात मिळालेल्या बातमीच्या ठिकाणाजवळ जावुन पाहणी केली असता दत्तमंदिर निवृत्तीनगर कडे जाणारे रोडचे आतील बाजुस असलेल्या मोकळ्या मैदानात वडगाव बुगा पुणे येथे एक टेम्पो उभा असलेला दिसला, सदर टेम्पो मधुन एक इसम पिवळ्या रंगाच्या गॅस टाक्याची अवैधरित्या साठा करुन विक्री करताना दिसुन आला त्यावेळी आमची व पंचाची खात्री झाल्याने वरील स्टाफच्या मदतीने सदर ठिकाणी दि.११/०१/२०२५ रोजी अचानकपणे छापा टाकला असता सदर ठिकाणी एक इसम मिळुन आला त्याला आम्ही आमचे सोबतचे पोलीस स्टाफ व दोन पंचांची ओळख करुन देवुन पोलीस कारवाईचा उद्देश सांगितला असता त्याने सहकार्य करण्याची संमती दर्शविल्याने सपोनि सचिन निकम यांनी त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांने त्याचे नाव १) विकास धोंडाप्पा आकळे वय ३१ वर्षे रा. चरवड वस्ती दत्त मंदीराजवळ, वडगाव बुद्रुक पुणे मुळ रा. डोंगरगाव ता मंगळवेढा जि सोलापुर सध्या रा. रिध्दी-सिध्दी विल्डींग पार्कीग रुममध्ये, सिंहगड कॉलेज वडगाव बुद्रुक पुणे सदर इसमाच्या ताब्यात मिळुन आलेल्या टाक्यांची पंचाची समक्ष पाहणी केली असता भारत गॅस कंपनीच्या घरगुती वापरातील एकुण ६१ टाक्या व एक टेम्पो असा एकुण ४,०९,०००/-रु. कि.चा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करुन आरोपी यांचे विरुध्द सिंहगड रोड पो स्टेशन गुन्हा रजि नं २३/२०२५ बी.एन.एस. कलम भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम २८७,२८८,३ (५) सह जिवनावश्यक वस्तुचा कायदा १९५५ चे कलम ३,७ अन्वये दाखल करण्यात आला असुन पुढील अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम हे करीत आहेत.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर प्रविणकुमार पाटील पोलीस उप-आयुक्त परी ३ पुणे संभाजी कदम, सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, अजय परमार सिहगड रोड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, दिलीप दाईगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार, संजय शिंदे, आण्णा केकाण, उत्तम तारु, पंकज देशमुख, देवा चव्हाण, अमोल पाटील, विकास पांडोळे, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, विकास बांदल, यांचे पथकाने केली.