पुणे-कात्रज येथील मस्तान हॉटेलजवळ सहकारनगर पोलिसांनी तळजाई वसाहतीतील अवघ्या २० वर्षीय तरुणाला पिस्टल विकताना पकडले आहे .
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’हा तरुण सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ०१ पिस्टल ०२ राऊंड असा ४८,८००/- रु.कि.चा मुददेमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. पोलीस असेही म्हणाले कि,’पुणे शहरात सराईत गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई तसेच अग्निशस्त्रे बाळगणा-या इसमांना वेळोवेळी त्यास चेक करुन कायदेशीर कारवाई करणेचे आदेशीत करण्यात आले होते. त्याअनुषगाने पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ०२ कडील अधिकारी व अमंलदार हददीत गस्त करीत असताना दि. ११/०१/२०२५ रोजी पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव यांना गुप्त बातमीद रामार्फत माहिती मिळाली की, मस्तान हॉटेल जवळ कात्रज रोडवर एक इसम पिस्टल/अग्नीशस्त्र घेवून येणार आहेत अशी बातमी मिळाली.सदर बातमी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना दिली असता त्यांनी युनिट कडील अधिकारी व अमंलदार यांना सापळा व छापा कारवाई करणेकामी आदेशीत केले. त्याप्रमाणे युनिट कडील अधिकारी व अमंलदार यांनी मिळालेल्या गोपनिय बातमीप्रमाणे गुन्हेगार नामे सोहम शशिकात वाघमारे वय २० रा तळजाई वसाहत सहकारनगर पुणे यास ताब्यात घेवून त्याचेकडून ०१ लोखंडी पिस्टल मॅगझीनसह व ०२ जिवंत काडतुसे असा ४८,८०० /- रु कि.चा माल जप्त केला आहे. त्याने सदर अग्निशस्त्र व काडतुसे हे अनाधिकाराने बेकायदेशीर रित्या विनापरवाना जवळ बाळगून विक्रीकरीता घेवून आल्याबाबत कबुली दिली आहे. त्याचेवर भारती विदयापीठ पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा रजि क्रमांक ३१/२०२५ आर्म अॅक्ट कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोद करण्यात आला आहे. अधिक तपास चालु आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा. पो. आयुक्त गुन्हे, १ श्री गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर, सपोनि आशिष कवठेकर, अमोल रसाळ, पो.उप.निरी नितीन कांबळे, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, अमोल सरडे, गणेश थोरात, ओमकार कुंभार, हनुमत कांबळे, विनोद चव्हाण, प्रमोद कोकणे विजयकुमार पवार, राहुल शिंदे, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख, यांनी केली आहे.