श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती व कोथरूड तर्फे आयोजन
पुणे : धनुर्मास निमित्त पर्वतीवरील श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पानिपत येथील मातीचे पूजन आणि तुळशी वृंदावन स्थापना करण्यात आली. पानिपत चौकामध्ये झालेल्या कार्यक्रमात तुळशी वृंदावनात तुळस देखील लावण्यात आली.
श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती व कोथरूड तर्फे धनुर्मास उत्सव पर्वती चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जयमंगलादेवी पेशवे, सुचेतादेवी पेशवे , ज्येष्ठ मुर्तीशास्त्र अभ्यासक डॉ. गो.बं. देगलूरकर, संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत, विश्वस्त पुष्कर पेशवे, सुधीर पंडित , जगन्नाथ लडकत, आशिष कुलकर्णी, तसेच पूजा पेशवे यांसह संपूर्ण पेशवे परिवार उपस्थित होता.
पर्वतीवरील पानिपत चौकामध्ये तुळशी वृंदावनासह महाराष्ट्रातील इ.स.१ पासूनची ठळक घटनांची भित्तीचित्रे आमदार माधुरी मिसाळ यांनी वेळोवेळी उपलब्ध करून दिलेल्या भरघोस विकास निधीमुळे शक्य झाले आहे अशी माहिती प्रमुख विश्वस्त रमेश भागवत यांनी यावेळी दिली. तसेच पर्वतीवरील विविध विकासकामांच्या निमित्ताने पुणेकरांकरिता पर्वती वारसा सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री देवदेवेश्वर मंदिर, विष्णू मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, कार्तिकस्वामी मंदिर, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे पुतळा याविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर धनुर्मास निमित्त भोजन प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.