योनेक्स सनराईज पीवायसी एचटीबीए अमनोरा कप १५ वी जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धाहवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजन
पुणे : अनन्या बोंद्रे, नाव्या रांका, सिद्धी जगदाळे आणि सई जोशी यांनी पीवायसी एचटीबीसी-अमनोरा कप जिल्हा सुपर-५०० मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत १७वर्षांखालील मुलींच्या गटात विजयी सलामी दिली. पीवायसी हिंदू जिमखाना येथील बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे.
या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या सलामीच्या लढतीत सई जोशीने प्रेरणा खाडेवर २१-१५, २१-१५ अशी, तर नाव्या रांकाने शिप्रा कदमवर २१-१०, २१-११अशी, तर अनन्या बोंद्रेने साची संचेतीवर २१-१८, २१-१३ अशी मात केली. सिद्धी जगदाळेने लतिका पुजारीवर २१-१५, २१-१२ असा विजय मिळवला.
देवश्री जिनराळकरने इरा कपिलाला २१-१०, २१-११ असे, तर शिवांजलीने कर्डिलेला २१-९, २१-१५असे नमविले. मोक्षित, ओंकार तिसऱ्या फेरीत या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या दुस-या फेरीत मोक्षित पोरवाल तिस-या मानांकित जयंत कुलकर्णीला १८-२१, २१-१३, २१-१४ असा पराभवाचा धक्का दिला. निनाद कुलकर्णीने जतिन ठक्करला २१-२, २१-७ असे सहज नमविले. ओंकार लिंगेगौडाने दिव्यांश सिंगवर २२-२०, २१-१५ अशी मात करून तिसरी फेरी गाठली.अग्रिमा-निधीमध्ये अंतिम लढतस्पर्धेतील ११ वर्षांखालील मुलींच्या गटातील अंतिम लढत अग्रिमा राणा आणि निधी गायकवाड यांच्यात होणार आहे. उपांत्य फेरीत अग्रिमाने केयारा साखरेवर २१-३ २१-८ अशी, तर निधीने स्वरा कुलकर्णीवर २१-१५, २१-१२ अशी मात केली.
सान्वी, सोयराची आगेकूच स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलींच्या उपांत्यपूर्व फेरीत शरयू रांजणेने आराध्या ढेरेवर २१-११, २१-११ असा, सान्वी पाटीलने शर्वरी सुरवसेने १७-२१, २१-१५, २१-१९ असा, ख्याती कत्रेने स्वराली थोरवेवर २१-४, २१-९ असा आणि सोयरा शेलारने समन्वया धनंजयवर २१-१३, २१-५ असा विजय मिळवला. कायरा-गार्गीत फायनल स्पर्धेतील १३ वर्षांखालील मुलींच्या गटाच्या उपांत्य फेरीत कायरा रैनाने ध्रुवी कुम्बेफाळकरला २१-१२, २१-१९वर अशी, तर गार्गी कामठेकरने धानी झालवादियावर २१-१७, २१-१७ अशी मात केली.
निकाल – पुरुष एकेरी – दुसरी फेरी – चैतन्य खरात वि.वि. रौनक चंडक २१-५, २१-७, अनिश भूजबळ वि. वि. समीर गणपुले २१-१७, २१-१७, विवेक चंद्रवंशी वि. वि. विनीत पानळे २१-१८, २१-१०, सुजल खुडे वि. वि. जिनेश मुथा २१-१९,२१-१२, कोनार्क इंचेकर वि. वि. अरिजित गुंड १७-२१, २१-१७, २१-११, ध्रुव निकम वि.वि. ईशान कौशिक २१-१३, २१-१४, सुदीप खोराटे वि. वि. श्लोक डागा १०-२१, २१-१९,२२-२०, अभिजित कदम वि. वि. साईदत्त गुंडू २१-६, २१-१२, ध्रुव खोबरे वि. वि.हर्षवर्धन अगरवाल २१-१४, २१-१३, देवेश पाटील वि. वि. वैष्णव गोळे २३-२१, २१-१४,गणेश जाधव वि. वि. साईराज पवार २१-५, २१-४.
१५ वर्षांखालील मुले – उपांत्यपूर्व फेरी – अनय एकबोटे वि. वि. एस. सोमजी २१-१८, २१-१९, चिन्मय फणसे वि. वि. महिराज सिंह राणा २१-१०,२१-९. १९ वर्षांखालील मुले – दुसरी फेरी – निक्षेप कात्रेवि. वि. नितीन एस. २१-१८, २१-१७, सुदीप खोराटे वि. वि. श्रेयस मासळेकर २१-१८,२४-२२. महिला एकेरी – पहिली फेरी – जिया उत्तेकर वि. वि.जान्हवी कुलकर्णी २१-१२, २१-४, मधुरा काकडे पुढे चाल वि. इंदिरा पाचरणे, यशस्वी काळे वि. वि. नेहा गाडगीळ २१-११, २१-१२, एकिशा मेदाने वि. वि. प्रणाली डोईफोडे २१-१९, २१-१६, २१-१९.